Gold Silver Rate | गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदिने मोठी उसळी घेतली होती तर, शेवटी ह्या दरांमध्ये घसरण झाली होती. मात्र आता कालपर्यंत स्थिर असलेले सोने-चांदीचे हे दर आज पुन्हा वर आल्याचे दिसत आहे. सुरुवातीचे सलग तीन दिवस आलेख वर सरकत होता.
मात्र, शेवटच्या तीन दिवसांत हा आलेख खाली आला. ह्या वर्षी दसरा-दिवाळीपासूनच ह्या मौल्यवान धातूंमध्ये दरवाढीचे सत्र सुरु असून, किंमतींनी ह्या महिन्यात अनेक नवीन रेकॉर्ड नोंदवले आहेत. दरम्यान, आता ह्या आठवड्याच्या सुरुवातीलाच ह्या दोन्ही मौल्यवान धातूंनी दरवाढीचा पवित्र घेतला आहे. असे आहेत सोने-चांदीचे आजचे दर..? (Gold Silver Rate)
Gold-Silver Price | सोने खरेदीची हीच उत्तम संधी; असे आहेत आजचे दर
सोने झळाळले
ह्या आठवड्याच्या सुरुवातीलाच आज सोन्याने दरवाढीचा पवित्र घेतला असून, आज सोन्याचे दर हे १०० रुपयांनी वाढले आहेत. मागील आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरांमध्ये हे ५५० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर मात्र सोन्यात १,१०० रुपयांची दरवाढ झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम हे ५७,५५० रुपये आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर हे ६२,७७० रुपये इतके आहेत. (Gold Silver Rate)
चांदीचीही आगेकूच |(Gold Silver Rate)
दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या दरांमध्ये तब्बल ३०० रुपयांनी दर वाढ झाली आणि मागील आठवड्यात चांदीच्या किंमतींमध्ये ३,५०० रुपयांची दर वाढ झाली होती. तर, १६ डिसेंबर रोजी चांदीच्या किंमतींमध्ये तब्बल ८०० रुपयांनी घसरण झालेली होती. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी चांदीत पुन्हा ३०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा आजचा दर हा ७८,००० रुपये इतका आहे.
Gold Silver Rate | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा आजचा भाव..?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज प्रत्येक कॅरेटनुसार सोन्याचे आजचे दर हे पुढील प्रमाणे आहेत. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६१,९०२ रुपये असे आहेत. २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर हे ६१,६५४ रुपये असे आहेत. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५६,७०२ रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम ४६,४२७ रुपये असे आहेत. १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे आज ३६,२१३ रुपये असे आहेत. दरम्यान, आज एक किलो चांदीचे दर हे ७३,५८८ रुपयांवर पोहोचले आहे. (Gold Silver Rate)
(वर दिलेले सोन्याचे दर हे सूचक असून, त्यात करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम