Horoscope 10 January | ‘या’ लोकांना मिळणार नोकरीची संधी; वाचा आजचे राशीभविष्य

0
25
Horoscope 12 january
Horoscope 12 january

Horoscope 10 January |  आज ग्रहांच्या हालचालींनुसार असे आहेत पुढील बारा राशींचे राशिभविष्य.. आज काही काही राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर, काहिंना आज वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची साठ मिळेल, काहींना उत्तम नोकरी तर, काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कसोटीचा दिवस असेल. तर असे आहे तुमचे आजचे राशीभविष्य…(Horoscope 10 January)

मेष राशी 

आजचा दिवस हा मेष राशीच्या लोकांसाठी भाग्याचा दिवस असेल. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज चांगली जनप्रसिद्धी मिळेल. तर, विद्यार्थ्यांना आज चांगल्या ठिकानहून नोकरीकरीता बोलावणे येऊ शकते. तरूणांनी आजपर्यंत क्षेत्रात केलेल्या मेहनतीचे त्यांना चांगले फळ मिळेल. मात्र, यामुळे भरावून न जाता पुढेही कठोर परिश्रम सुरू ठेवावे. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल. विशेषतः कपड्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. मुलांकडून आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. यामुळे आजचा दिवस हा मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असणार आहे.

वृषभ राशी 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. आज तुम्ही एखादी मोठी वस्तु खरेदी करू शकतात. कौटुंबिक आयुष्यात आज तुम्हाला तुमच्या मुळणसोबत चांगला वेळ घालवता येईल. तुमच्यावरील एखादे कोर्ट प्रकरण आज मिटू शकते. आज तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल. आरोग्य विषयक बोलायचे झाले तर, तुम्हाला काही आजार असल्यास त्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो. (Horoscope 10 January)

Horoscope 9 January | ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराची साथ; वाचा आजचे राशीभविष्य

मिथुन राशी 

आज दिवस हा लाभदायक ठरणार आहे. व्यावसायिक आज त्यांचा व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. तसेच, आज व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आज तुम्हाला तुमच्या रागावर आणि भाषेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. रागावर नियंत्रण न ठेवल्यास आज काही चुकीचे निर्णय तुमच्याकडून घेतले जातील. तसेच, महत्त्वाच्या कामांमध्ये आज घरातील सदस्यांचा हातभार लागेल. वैवाहिक आयुष्यही आज अतिशय चांगले जाईल.

Horoscope 10 January | कर्क राशी 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला जाईल. आज तुमच्याकडून काही सांस्कृतिक कार्य घडतील. खेळाडूंसाठी आजचा दिवस हा उत्तम ठरणार आहे. कारण आज त्यांना स्पर्धेत यश मिळू शकते. तसेच, आज तुमहला तुमच्या सहाहकाऱ्यांकडून आज काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. काही प्रॉपर्टीची प्रकरणं प्रलंबित असल्यास तीही आज मार्गी लागतील. तरुणांनी कुठे नोकरीसाठी अर्ज केला असेल, तर त्यांना आज तिथून मुलाखतीसाठी बोलवले जाऊ शकते. आज कुठल्या प्रलंबित परीक्षेचा निकल लागणार असल्यास तो निकालही उत्तम लागेल. एकूण आजचा दिवस हा मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक भरभराटीचा असेल. .(Horoscope 10 January)

सिंह राशी 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. व्यवसायिकांना आज त्यांच्या व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी चांगला सल्लागार मिळेल, आणि त्याच्या मदतीने तुमचा व्यवसाय हा आता योग्यरित्या चालेल. आज तुमच्या स्वभावामुळे अनेक लोक तुमच्यावर प्रभावित होतील. आज कुटुंबासोबत किंवा मित्र परिवारासोबत चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांकडून आज काही समाज हिताचे कार्य घडेल.

कन्या राशी 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम असेल. आज या राशीच्या लोकांनी योगा करावा म्हणजे आज तुमचे मन एकाग्र आणि शांत राहील. व्यावसायिक आज त्यांच्या व्यवसायात काही खांदे पालट करू शकतात. मात्र, यामुळे तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल. नोकरदार वर्गासाठी आज कामाच्या ठिकाणी दिलेले काम हे अचूक आणि वेळेत पूर्ण होईल व यामुळे तुमचे आज कार्यालयात कौतुक होऊ शकते. तसेच, कामानिमित्त आज तुम्हाला बाहेरही जावे लागू शकते. (Horoscope 10 January)

Horoscope 7 January | ‘या’ लोकांनी आज संयम बाळगावा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

तूळ राशी –

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाने भरलेला दिवस असेल. आज एखाद्या व्यक्तीच्या येण्यामुळे तुमचं दिवस हा आनंदी जाईल. कौटुंबिक आयुष्यदेखील उत्तम असेल. जे तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना आज एखाद्या कंपनीतून ऑफर येऊ शकते. वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आज नवविवाहित जोडप्यांना एकत्र वेळ घालवता येईल. तसेच यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा वाढेल. महिला आज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. (Horoscope 10 January)

वृश्चिक राशी – 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा असेल. या राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदी आणि उत्साहाने भरलेला असेल. त्यांना आज त्यांच्या मुलांची साथ मिळेल. व्यावसायिक असलेल्या महिलांना त्यांच्या व्यवसायात आज चांगला नफा मिळेल. आज वडीलधाऱ्यांची सेवा केल्यास त्यांच्या शुभाआशिर्वादांमुळे संकटे टळतील. आरोग्याबाबत बोलायचे झाल्यास, आज आरोग्याबाबत जरा अधिक सावध रहा. वैवाहिक आयुष्यात आज जोडीदाराकडून कामात साथ लाभेल. तर, विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस हा उत्तम असणार आहे.

धनु राशी – 

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम असेल. मात्र, आज कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना, सावधगिरी बाळगावी. आज तुम्ही नवे घर किंवा काही नवीन मालमत्ता खरेदीचा विचार करू शकता. आज तुम्ही तुमची सर्व कामे ही आत्मविश्वासाने कराल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करू शकतात. महिलांसाठी आजचा दिवस हा अतिशय चांगला असेल आज काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

मकर राशी – 

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा चांगला असेल. मात्र, आज आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी आज त्यांच्या वरिष्ठांकडून एखादा नवीन  प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. तर, काहीतरी नवीनही शिकायला मिळेल. आज तुमच्या हातून एखाद्या गरजू व्यक्तीला मदत होईल. ज्यामुळे तुमचे मन आज प्रसन्न राहील. राजकीय क्षेत्रातील लोकांसाठीही आजचा दिवस चांगला असेल. आज त्यांची प्रसिद्धी वाढेल. (Horoscope 10 January)

Horoscope 5 January | ‘या’ राशीच्या लोकांची आज भरभराट; वाचा आजचे राशीभविष्य

कुंभ राशी – 

आजचा दिवस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. आज कुठलेही काम करताना तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आज तुमचे आणि तुमच्या जोडीदारातील वाद मिटतील. नोकरदार वर्गाने आज कामाच्या ठिकाणी रोजच्या तुलनेत आणखी थोडी जास्त मेहनत घेतल्यास, वरिष्ठ खुश होतील. तसेच आज तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. तुम्ही आज तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाण्याची योजना करू शकतात. (Horoscope 10 January)

मीन राशी – 

आज तुमचा हा मीन राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल. आज तुमचे काही मोठे आर्थिक व्यवहार होतील. आज तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलाल. नवविवाहित जोडप्यांना आज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास आज तुमचे आरोग्य हे अत्यंत उत्तम असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चित्रपट बघायला जाऊ शकतात. व्यावसायिक आज त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलतील. .(Horoscope 10 January)

(वरील माहिती हे ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करीत नाही किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here