Tilak award history : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अनेक दिवसानंतर राज्यात आले आहेत पुणे येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.
लोकमान्य टिळक यांच्या आज 103 वी पुण्यतिथी असल्याने समाजासाठी अतुलनीय व अमूल्य कार्य करणारे आणि प्रतिष्ठित अशा लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या प्रणांगणात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावर्षी थेट पंतप्रधानांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याने हा कार्यक्रम बघण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींना का देण्यात आला टिळक पुरस्कार
बाळ गंगाधर टिळक यांना स्वातंत्र्य सेनानी आणि भारतीय स्वराज्याचा समर्थक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांनी सर्वसामान्यांना संघटित होण्याचा संदेश दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून योगदान देत आहेत पंतप्रधान मोदी अनन्य साधारण नेतृत्व असून मोदींच्या या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी 41 व्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आलं असल्याच मत टिळक स्मारक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल आहे.
या आधी कोणाकोणाला मिळाला पुरस्कार
माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, तसेच एस एम जोशी, शरद पवार याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक आर नारायण मूर्ती, मेट्रो मॅन म्हणून ओळख असलेले श्रीधरण यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 40 जणांना हा पुरस्कार देण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरूप हे स्मृतिचिन्ह एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र अस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपरणं, पुणेरी पगडी, मानचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना देण्यात आलेला एक लाख रुपयांचा धनादेश त्यांना नमामि गंगे प्रोजेक्टसाठी देण्यात आला आहे.
https://thepointnow.in/opposition-leader/
एकीकडे आज पंतप्रधानांना आपल्या अमूल्य कार्यासाठी गौरविण्यात येत असताना दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस महाराष्ट्राला हादरवून देणाऱ्या घटनेच्या सुरुवातीला झाला. शहापूर जवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना गार्डन कोसळ आणून सतरा जण जागीच ठार झाल्याची हृदय द्रावक घटना घडली तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर असल्यामुळे ते आज या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम