Solapur : सोलापूर मध्ये असलेल्या ईदगाह मैदानाजवळ लव यू पाकिस्तान असा उल्लेख असलेले फुगे विक्री करणाऱ्या तिघा जणांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी राज्यामध्ये आषाढी एकादशी आणि बकरी हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडले मात्र यामध्ये या सणांना गालबोट लावण्याचा प्रयत्न सोलापूर मध्ये करण्यात आल्याच समोराला आहे. या ठिकाणी लव यू पाकिस्तान असा उल्लेख असलेले फुगे एक तरुण विकत असल्याचं काही मुस्लिम धर्मीय बांधवांच्या लक्षात आलं. ईदगाह मैदान या ठिकाणी बकरी ईद निमित्ताने नमाजसाठी हे बांधव आले होते. यावेळी त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. फुग्यांवर पाकिस्तानचा उल्लेख असलेले दोन फुगे विक्रेते आणि फुगे विक्री करणाऱ्या एका किरकोळ फुगे विक्रेत्याला याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत ताब्यात घेतल आहे.
एकूण तीन आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लव यु पाकिस्तान असा आक्षेपार्ह उल्लेख असलेले फुगे विक्री करणाचा प्लॅन कोणी केला? या मागचा नेमका हेतू काय होता? हे नेमकं कुणाचं षडयंत्र आहे? याचा तपास सोलापूर पोलीस करत आहेत.
ईदच्या दिवशी पाकिस्तान विषयी प्रेम दर्शवणारे फुगे विक्रीसाठी या तरुणांनी कुणाकडून आणले आणि कुणी नेमकं सामाजिक तेढ सोलापुरात निर्माण करण्याचा प्रयत्न केला याचा तपास पोलीस करत आहेत. तर कोणत्याही जातीधर्माच्या आरोपींचा यामध्ये समावेश असेल तरी देखील पोलीस याप्रकरणी सक्तीची कारवाई निश्चितच करतील असं पोलीस अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम