पावसाचा जोर वाढला पण नागरिकांनो काळजी घ्या; वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू

0
2

द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यात पावसाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झालेला असल्याचे दिसत असतांना, एक दुःखद घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात वीज पडून तिघा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी विजा पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यात अमरावती मध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झालेले आहेत.

पावसाचा जोर वाढल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र नागरिकांनी यादरम्यान स्वतःची काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना आत्तापर्यंत घडून गेल्या आहेत. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अंजनगाव रोडवर तामसवाडी फाट्याजवळ झाडाखाली उभी असलेली अंजनगाव सुर्जी येथील 21 वर्षीय रेश्मा इंगळे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे शेतात काम करत असताना 13 वर्षीय आयुष इंगळकर, तिवसा तालुक्यातील वरणगाव येथे शेतात गेलेला 14 वर्षीय श्याम निरंजन शिंदे यांच्या अंगावर वीज पडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर नरेश मडवे आणि शंकर चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here