Gold-Silver Price | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’…

0
47

Gold-Silver Price | प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ६०,८१० रुपये इतकी असून, मागील काही काळात सोन्याची किंमत ही ६१,२३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​स्थिर होती. तसेच चांदीचा दर हा ७१,२२० रुपये प्रति किलो इतका आहे. काही दिवसांपूर्वी चांदीची किंमत ७२,३८० रुपये प्रतिकिलो अशी होती.

 कोणत्या शहरात कसे दर..? 

मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ही प्रति १० ग्रॅम ५५,७४३ रुपये इतकी आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,८१० प्रति १० ग्रॅम अशी आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅम ५५,७४३ असा आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,८१० रुपये असा आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ५५,७४३ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,८१० रुपये इतका आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर हा ५५,७४३ इतका आहे. तर, प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६०,८१० रुपये असा आहे.

Horoscope Today 2 November: या राशीच्या लोकांची होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या आजचे राशी भविष्य

दोन दिवसांत स्वस्त

गुडरिटर्न्सनुसार, मागील आठवड्यापासून सोन्याचे दर कमी झाले आहेत. २३ ऑक्टोबरला ३०० रुपयांनी सोने खाली आले होते. २८ ऑक्टोबर रोजी  ६०० रुपयांची दर वाढल्याने सोने एक हजारांनी महागले होते. ३० ऑक्टोबर रोजी सोने २३० रुपयांनी खाली आले आहेत. तर ३१ ऑक्टोबरला  सोने ५५० रुपयांनी स्वस्त झाली. दोन दिवसांत सोने ७८० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता २२ कॅरेट सोने ५६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचे दर ६२,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे.

चांदी घसरली

मागील आठवड्यात चांदीत १२०० रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने मुसंडी मारली. चांदीने १ हजारांची उसळी घेतली. ३० ऑक्टोबरला चांदीत दरवाढ झाली. पण, ३१ ऑक्टोबरला चांदीत पुन्हा ३०० रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा दर ७५,३०० रुपये असा आहे.

Aap news: आप ईडीच्या फेऱ्यात; केजरीवालांची आज चौकशी, अटकेची टांगती तलवार?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here