Gold Silver Rate | सोने-चांदीने या आठवड्यातही ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत नरमाई होती. दरम्यान, सोमवारी सोने-चांदीने ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. सोने चांदीचे भाव उतरले असून,धनत्रयोदशीपूर्वीच भाव अजून उतरले तर सराफ बाजारात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
दिवाळीचा सण आता तोंडावर आला आहे. धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांची सोने-चांदी खरेदीची लगबग सुरु झाली आहे. ऑक्टोबरच्या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरांत आपटी बार आला होता. मात्र, त्याचा चांगलाच फायदा ग्राहकांना झाला होता. त्यामुळे २४ कॅरेट सोने स्वस्त होण्याची आस ग्राहकांना लागली होती.
पण,जागतिक घडामोडींमुळे ग्राहकांचा हिरमोड झाला होता. सध्या सोने-चांदीच्या भावात चढउतार होत आहे. सोने जर ६०,००० रुपयांच्या खाली उतरले तरच दिवाळीत सराफ बाजारात गजबज वाढेल.
सोन्यात इतक्या रुपयांची घसरण
मागील दहा दिवसांत सोन्यात मोठी घसरण होताना दिसून आली. या दहा दिवसांमध्ये सोने जवळपास १४०० रुपयांनी खाली उतरले. तर या काळात सोन्यात २२० रुपयांची वाढ झाली होती. २ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ११० रुपयांची दरवाढ झाली होती.
३ नोव्हेंबरला त्यात १०० रुपयांची वाढ झाली. ४ नोव्हेंबर रोजी सोने ११० रुपयांनी खाली आले. ५ नोव्हेंबरला काहीच बदल झाला नाही. तर ६नोव्हेंबरला १५० रुपयांनी भाव उतरले आहेत. आता २२ कॅरेट सोने ५६,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,६२० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.
चांदी इतकी महागली
दरम्यान, ह्या महिन्याच्या सुरुवातीपासून चांदीत सातत्याने घसरण सुरु होती. त्याला आता ब्रेक लागला. मागील आठवड्यात चांदीत १२०० रुपयांची घसरण झाली. २ नोव्हेंबरला चांदीने ७०० रुपयांची उसळी घेतली आणि नंतर पुढेही तेवढीच घसरण झाली. ४ नोव्हेंबर रोजी त्यात ९०० रुपयांनी वाढ झाली. ६ नोव्हेंबर रोजी चांदी २०० रुपयांनी महागली होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचे दर हे आता ७५,२०० रुपये इतके आहे.
चांदवड तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे दुष्काळी मोर्चा; शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम