Political : महाराष्ट्र राज्यात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला.भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी महाविकास आघाडी, नंतर शिवसेनेतील बंडखोरी अन् आता राष्ट्रवादीतील फोडाफोडी ही सर्वसामान्य मतदारांची शुद्ध फसवणूक आहे. राज्यकर्त्यांनी आमच्या मतांचा बाजार मांडला असून आमचा मतदानाचा हक्क शासनाने परत घ्यावा या मागणीसाठी नांदेड मधील तरुणांनी बोटाला चुना लावून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लक्षवेधी आंदोलन केले आहे.political
तरुणांनी दिलेल्या माहिती नुसार, आम्ही प्रत्येक निवडणुकीत उत्साहात मतदान करतो; परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मंडळींनी आमच्या मतांची चेष्टा मांडत आमच्या अधिकाराचा खेळ मांडला आहे. आम्ही 2019 मध्ये एकदा मतदान केले; परंतु सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले हा सर्व प्रकार मतदारांची चेष्टा करणार आहे. Political यामुळे चक्क तरुणांनी बोटाला चुना लावून जिल्हाधिकारी कार्यलयापुढे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकायांना निवेदन देण्यात आले.
हे राजकारण लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारख आहे.रविवारी महाराष्ट्रात शपथविधी झाला. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून लोकशाहीचा खून करणारा आहे. हे सर्व पाहून लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे. मतदान कुणालाही केले तरी सर्व पक्ष मात्र सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. त्यामुळे संविधानाने आम्हाला दिलेला मतांचा अधिकार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
एकीकडे राज्यामध्ये शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होत असताना दुसरीकडे मात्र सत्तेसाठी सर्रासपणे बंड पुकारत शपथविधी उरकले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून केला जातो. तर लोकशाही आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे त्यामुळेच या राजकारणाला वैतागून नांदेड मधील तरुणांनी बोटाला चुना लावून घेत संविधानाने आम्हाला दिलेला मतांचा अधिकार शासनाने परत घ्यावा अशी मागणी केली आहे. यामुळे या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम