चारित्र्याबाबत संशयाची पाल चुकचुकली आणि त्याने पत्नी व मुलीसोबत केले हे भयानक कृत्य..

0
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  : मुंबईमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि मुलीवर ऍसिड हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या मालाड मालवणी येथे एका व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. आणि याच संशयाच्या कारणातून त्याने आपल्या पत्नीवर आणि मुलीवर ऍसिड हल्ला केला. यात दोघी जणींना जवळच्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पत्नीबरोबर झालेल्या भांडणातून त्याने तिला मारहाण केली होती. आणि याचदरम्यान त्याने ऍसिड हल्ला केला व तो पसार झाला होता. मात्र पोलिसांनी संबंधित आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

पती – पत्नीच्या संसाराचा आधार हा एकच खांब असतो. आणि तो म्हणजे विश्वास. मात्र या विश्वासाच्या दरम्यान थोडी जरी संशयाची पाल चुकचुकली तर ती साऱ्या संसाराचा विनाश करते. आणि अशाच प्रकारे मुंबई येथे या व्यक्तीच्या आपल्या पत्नीच्या चारित्र्याबाबत संशयाची पाल चुकचुकली आणि त्याने हे गैरकृत्य केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here