सती प्रथेमागील इतिहास मनसेने सांगितला ; वाचा सविस्तर

0
10

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : राजकीय वातावरणातील वणवा विझतो न विझतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेने तेलासारखे काम केले. राज ठाकरेंच्या व्यक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ पाहायला मिळाली. तर सध्या मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन हे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलले व्यक्तव्य आता मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन हे मनसेचे प्रवक्ते आहेत. काही दिवसांपूर्वी  एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरातमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत एक विधान केले होते. ‘मुस्लिम हे भारतील किरायदार नसून हक्कदार,’ असल्याचे म्हटले होते.

प्रकाश महाजन यांनी याच विधानाला टार्गेट करत ओवैसी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडला आहे. ‘मुस्लिम हे भारतीलहक्कदार नव्हे तर आश्रित आहेत,’ असे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट सांगितले. एका सभे मध्ये बोलताना महाजन यांनी हे विधान केले आहे.

याबद्दल सविस्तर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, ‘त्या काळातील राजेमहाराजांनी सहिष्णुतेचे धोरण अवलंबून मुस्लिमांवर दया करून त्यांना येथे ठेवले. पण ते आता या घराचे मालक बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते हक्कदार कधीच होऊ शकत नाहीत ते आश्रित आहेत,’ असे महाजन म्हणाले.

त्यासोबतच पुढे बोलताना महाजन यांनी सती प्रथा कशी सुरू झाली? याबद्दल देखील भाष्य केले. ‘मेल्यावरही आपल्यावर अत्याचार होऊ नये त्याकरिता मोगलांच्या भीतीने हिंदू महिलांनी पतीच्या चितेवरच आत्महत्या करण्यास सुरुवात केली. या कारणामुळेच सती प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली,’ असे महाजन म्हणाले.

दरम्यानच, काही दिवसांआधी पासूनच राजकीय वर्तुळात औरंगजेबाच्या कबरीचा विषयावर चांगलीच चर्चा रंगतीये. याबाबत बोलताना महाजन म्हणाले, ‘कबरीवर न जाण्याकरिता कोणताही कायदा करण्याची काही आवश्यकता नाही मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतिक असलेली औरंगजेबाची कबर तिथेच राहायला हवी.’

तसेच पुढे ते म्हणाले, ‘भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानात गेले होते. तिथे अडवाणी गेले असताना त्यांना बॅरिस्टर जिनाची कबर दाखवली गेली. त्यात काहीच वाईट नव्हते. परंतु, आताचे काही लोक हिंदूंना खिजवण्याकरिता औरंगजेबाच्या कबरीवर काही कारण नसताना जातात, ‘असे स्पष्टपणे महाजन म्हणाले.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here