पावसाचा हाहाकार! आत्तापर्यंत 80 हुन अधिक जणांचा मृत्यू

0
18

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात बहुतांश भागात अद्याप पावसाची म्हणावी तशी सुरुवात झाली नसल्याने, सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आसाम आणि मेघालय मध्ये मात्र पावसाने कहर केला आहे. आणि यात आत्तापर्यंत तब्बल 81 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

आसाम आणि मेघालय मध्ये पावसाने जबरदस्त कहर केला आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये पावसाने केलेल्या कहरामुळे NDRF द्वारे मदतकार्य मोहीम सुरू आहेत. या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 38 लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. सुरू असलेल्या मदत कार्याद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे.

दरम्यान, रविवारी मदतकार्यादरम्यान नाव पलटून चौघे जण बेपत्ता झाले होते. दोन्हीही राज्यांमध्ये नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. असे असतांना देशात अनेक ठिकाणी मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. दोन्हीही राज्यांमधील परिस्थिती इतकी बिघडली आहे की लाखो लोक यामुळे प्रभावित झाले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here