सातारा | मराठा आंदोलनाची धग गावापासून आता मंदिरांपर्यंत पोहोचल्याची दिसून येत आहे. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर आता राजकारण्यांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आलेली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शन घेता येणार नाहीये. मंदिराबरोबर गावातही येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाची धग आता राज्यभर पसरताना दिसते आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर आता गावागावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात येते आहे. त्यातच आता ही बंदी मंदिरापर्यंतही पोहोचल्याचे दिसून येत आहे.
Pomegranate News | बळीराजाची दिवाळी होणार गोड! डाळिंबाची मोठी दरवाढ
साताऱ्यातील मांढरदेवी ग्रामपंचायतीचा निर्णय
साताऱ्यातील मांढरदेवी गावात आता राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. तसेच मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शनासही बंदी घालण्यात आलेली आहे. मराठा समाजातील अंदोलकांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मांढरदेवी ग्रामपंचायतीनेदेखील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे.
राज्यभरात गावबंदीचा निर्णय
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. तसेच, गावात कोणतेही पुढारी आल्यास त्यांना विरोध करण्यात येतो आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात देखील तापतांना दिसतो आहे.
Manoj Jarange Patil| … आणि जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम