Scam : अजित पवारांच्या निकटवर्तीयांना नोटिसा म्हणूनच दादा भाजपच्या तंबूत ?

0
13

Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कथित महाराष्ट्र शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणी विशेष पी एम एल कोर्टाने दखल घेत याप्रकरणी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच अजित पवारांच्या निकटवर्ती यांना समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे. Scam

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाला नवीन वळण मिळालं आणि महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारत 40 आमदारांना सोबत घेत भाजपा – शिंदे सरकारसोबत हात मिळवणी केली. Scam यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. आयकर विभागाकडून कारवाई होईल या भीतीने अजित पवारांसह समर्थक राष्ट्रवादी मधून बाहेर पडले असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. यातच आता राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कथित महाराष्ट्र शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी विशेष पी एम एल कोर्टाने दखल घेतली आहे. व या प्रकरणी काही महत्त्वाची निरीक्षण देखील नोंदवली आहेत. याचबरोबर अजित पवार यांच्या काही निकटवर्ती यांना कोर्टाने समन्स देखील बजावल आहे. याप्रकरणी आयकर विभागाने जरंडेश्वर कारखाना प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. Scam आणि याच प्रकरणी आता अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या काही निकटवर्तीयांना कोर्टाने समन्स बजावले असल्याचा सूत्रांच म्हणणं आहे.

*काय आहे कथित शिखर बँक व जरंडेश्वर कारखाना घोटाळा*

मेसर्स जरंडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीमध्ये मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी होती. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही Scam उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याच समोर आलं.

त्यावेळी सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची इमारत, जागा व संबंधित इतर बांधकाम जप्त करण्यात आलं होत. त्यावेळी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. तसेच या सहकारी साखर करखान्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संबंध असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांच म्हणणं होत.Scam

दरम्यान तपासात जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती. व तो कारखाना  मूळ किमतीपेक्षा कमी किंमतीमध्ये म्हणजेच ६५ कोटी ७५ लाख रुपयांना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. ली यांनी खरेदी केला. व मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्यातत्वावर देण्यात आला. त्यावेळी त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती.याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा ली मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रा ली. कंपनीचा हिस्सा होता व ती कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची असल्याच कारवाई मध्ये उघड झाले. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता.मात्र, Scamगुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय होता.

दरम्यान जरंडेश्वर शुगर मिल ने पुणे जिल्हा को. ऑप बँकेकडून जवळपास 700 कोटी रुपये कर्ज घेतलं.  हे कर्ज 2010 पासून पुढील काळात घेण्यात आल होत.  सध्या हा कारखाना सील करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here