निवडणुक आयोग शिंदेंना माहिती पुरवतोय ; ठाकरेंचा गंभीर आरोप

0
23

राज्यातील वाद काही मिटताना दिसत नाहीत, अनेक गंभीर आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहण्यात आले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग आपल्या निर्णयात पक्षपाती वृत्ती करत असून एकनाथ शिंदे गटाची बाजू घेत असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामुळे त्यांची रणनीती शिंदे गटाला पोहचत असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह निश्चित करण्यात शिंदे गटाची बाजू घेत असल्याचा आरोप निवडणूक आयोगावर ठाकरेंनी केला आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात 12 मुद्दे उपस्थित केले आहेत. ठाकरे गटाचे वकील विवेक सिंह यांनी निवडणूक आयोगासमोर हा प्रश्न उपस्थित केला की, ‘आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलेले पक्षाचे नाव आणि चिन्हाचे पर्याय मुद्दाम वेबसाईटवर टाकण्यात आले होते. त्यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. जर या गोष्टींमध्ये तथ्य नसेल तर दोन्ही गटांच्या पर्यायांमध्ये इतके साम्य कसे आहे ?

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय शिंदे गटाला डावपेच कसे कळतात ? असा सवाल ठाकरे गटाने केला

ठाकरे गटाने आपल्या पत्रात स्पष्टपणे आरोप केला आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची सर्व रणनीती शिंदे गटाकडे उघड केली आहे. ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, त्यांच्या यादीतील नाव आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला कळू शकेल. हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय शक्य झाले नसते.

शिंदे गटाने दिले उत्तर, ठाकरे गटाचे रडगाणे आणि आरडाओरडा नवीन नाही.

मात्र, शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘निवडणूक आयोग आपल्या कार्यक्षेत्रात काम करतो. ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय आल्यास त्यांना सर्व काही ठीक वाटते. कोणी निर्णयाच्या विरोधात गेले तर त्यांची रणनीती फुटली असा आक्रोश आहे. यात काहीही तथ्य नसून निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ती घटनात्मक चौकटीत काम करते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here