Palghar पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे अतिशय दुर्गम व मागासलेले भाग, या दुर्गम भागात ग्रामीण भागात असलेल्या पाड्यांना जोडणारे रस्ते, नद्यां यांवर पूलच नसल्याने नागरिकांना दरवर्षी अडचणींना सामोरे जावे लागते. याठिकाणी वाहत्या नद्यांमधून नागरिकांना जीवघेणा प्रवास करत रस्ता काढावा लागतो. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंडेपाडा येथून अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर येत आहे.
शेंडेपाडा येथे राहणारी सुरेखा लहू भागडे ही महिला सात महिन्याची गरोदर आहे. तिला अचानकपणे उलट्यांचा त्रास व्हायला सुरुवात झाली. दरम्यान तिची परिस्थिती बिघडत असल्याने रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी करण्यात आली. जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला न्यायचे होते मात्र तिला घेऊन जाण्यासाठी गावातून रस्ताच नसल्याने तिला नदी पात्रातून डोलीच्या सहाय्याने घेऊन जावे लागले.
https://thepointnow.in/pilots-refusal-to-take-off-due-to-end-of-duty/
सात महिन्याच्या गरोदर ही महिला सकाळपासून उलट्या करत होती. या महिलेला नांदगाव रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना रस्ता नसल्याने नदी पार करुन मानेपर्यंतच्या पाण्यातून जावे लागले. सुरुवातीला तिच्यासाठी कापडाची डोली करुन घरापासून जवळपास एक किलोमीटर पर्यंत कच्चा रस्ता आणि शेतामधून रस्ता काढत तिला नदीपर्यंत आणण्यात आले. आधी डोलीतून नंतर लाकडी फळीवर नदी पार करावी लागली या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ नंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम