Tesla | सध्या दिवसेंदिवस तंत्रज्ञान हे विकसित होत असून, आता मानवासाठी काहीही अशक्य राहिलेले नाही. माणसाचा व्याप कमी व्हावा यासाठी त्याने त्याच्या सोयीच्या गोष्टी बनवण्यास सुरुवात केली. यामुळे मानवी आयुष्य सोपे आणि चैनीचे झाले. मात्र, यामुळे मानवी आयुष्यावर चांगल्यासह अनेक वाईट परिणामही झाले. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. यावरून मानवी आयुष्यात तंत्रज्ञानाचा किती हस्तक्षेप असावा हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बॉलीवुडच्या ‘रोबोट’ ह्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणेच ही घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. एका मानवनिर्मित रोबोटने एका व्यक्तीवर हल्ला केला आणि इतकंच नाहीतर त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली आहे.( Tesla )
Tea | नवऱ्याने गरम चहा मागितला आणि बायकोने त्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली
Tesla | रोबोटचा मानवावर जीवघेणा हल्ला
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच एलॉन मस्क यांच्या मालकीची प्रसिद्ध अशी इलेक्ट्रिक कारची निर्माती करणारी कंपनी टेस्लाच्या ( Tesla ) संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. दरम्यान एका माहितीनुसार, टेस्ला ह्या कंपनीच्या टेक्सासमधील गिगा या कारखान्यात एका रोबोटने एका मानवी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. दरम्यान, टेस्ला कंपनीच्या एका रोबोटने कर्मचाऱ्यावर भयानक हल्ला केला असून, त्याला जमिनीवर आपटत बेदम जखमी केले आहे. तसेच टेस्ला ह्या कंपनीने ही हृदयद्रावक घटना हि तब्बल दोन वर्ष लपवून ठेवल्याचंही सांगिण्यात आलं आहे.
Uddhav thackrey | ‘मविआ’त वाद चिघळले; ठाकरे-काँग्रेसमध्ये खंडाजंगी..?
रोबोटची कर्मचाऱ्याला कडकडून मिठी
दरम्यान या दुर्घटनेच्यावेळी उपस्थितांनी सांगितल्याप्रमाणे, हा जखमी इंजिनीअर रोबो नियंत्रण करणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामवर काम करत होता. तसेच त्यावर काम करता यावे म्हणून त्यांनी दोन अॅल्युमिनियम कटिंग रोबो हे अकार्यक्षम केलेले होते. मात्र, यावेळी चुकून तिसरा रोबोट हा अकार्यक्षम होऊ शकला नाही. तसेच या तिसऱ्या रोबोटने ह्या सोफ्टवेअर इंजिनीअर वरच हल्ला करून त्याला थेट जमिनीवरच आपटवलं. तसेच यानंतर त्याचे हात व पाठदेखील घट्ट पकडली. दरम्यान, यामुळे संबंधित इंजिनीयरला जबर मार लागला व तो रक्तबंबाळ झाला. हे बघताच त्यावेळी तिथे उपस्थित कर्मचाऱ्याने ‘इमर्जन्सी स्टॉप’चे बटण दाबले आणि त्यानंतरच जखमी इंजिनीअर स्वत:ला त्या अनियंत्रित रोबोच्या पकडीतून स्वतःला सोडवू शकला.( Tesla )
कर्मचारी जबर जखमी
दरम्यान, टेस्ला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे की, “ह्या अनियंत्रित रोबोच्या तावडीतून सुटल्यानंतर हा जखमी इंजिनीअर बाहेर पळला, आणि तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत होता. तसेच या घटनेची माहिती ट्रॅव्हिस काउंटीचे अधिकारी व आरोग्य संस्था यांना दिलेली आहे. हा अहवाल समोर आला आहे. ( Tesla )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम