Teachers Constituency Election | नाशिकच्या उमेदवारीवरून पुन्हा महायुतीत बिघाडी?; नाशकात हाय व्हॉल्टेज ड्रामा

0
79
Teachers Constituency Election
Teachers Constituency Election

Teachers Constituency Election |  लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होत आहे. काल शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तर, काल दिवसभर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्यात राडा पहायला मिळाला. एकाच नावाचे दोन उमेदवार असल्याने अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी शिंदे गटाकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.

तर, अहमदनगर येथील कोपरगाव येथील अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे आणि समर्थकांकडून मारहाण झाली असून, त्यांच्या शर्टचे बटन तोडण्यात आल्याचे आरोप भाजपचे नेते आणि शिक्षक निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केला आहे. दरम्यान, हा राडा पोलिसांसमोरच समोरच झाल्यानंतर अखेर अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना संरक्षण देण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाणे येथे (Nashikroad Police Station) नेण्यात आले. (Teachers Constituency Election)

Vidhan Parishad Election | नाशिकमधून विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल

Teachers Constituency Election | नेमकं काय घडलं..?

तर, यावेळी तिथेही शिंदे गटाचे काही वरीष्ठ पदाधिकारी पोहचले आणि अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव टाकला. यानंतर विवेक कोल्हे यांचे समर्थक नाशिकरोड पोलीस ठाण्याबाहेर जमल्याने शिंदे गटाच्या पदाधिकारी तिथून निघून गेले. यानंतर मात्र अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्या कुटूंबियांना नाशिक पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि त्यांना कुटूंबियांकडे स्वाधीन केले. पोलीस बंदोबस्तात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रात्री साडेदहा वाजता घरी सोडले.

८ तास पोलीस ठाण्यात थांबूनही तक्रार नाही 

माघार घेण्यासाठी अजून तीन दिवसांचा अवधी असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच हे माघारीनाट्य नाशिकमध्ये रंगले होते. तर, यामुळे आता नाशिक लोकसभेनंतर नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. मात्र, या प्रकरणी आपले कपडे फाडले असल्याची जाहीर कबुली देत ८ तास पोलीस ठाण्यात थांबूनही अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी पोलिसांत शिंदे गटाविरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अद्याप माघारीसाठी तीन दिवसांचा कालावधी असून,  या येणाऱ्या काळात कुठले राजकीय नाट्य घडते हे पहावे लागणार आहे.  (Teachers Constituency Election)

Nashik News | नाशिक शिक्षक मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंधूंची उडी

नाशिकच्या उमेदवारीवरून पुन्हा महायुतीत बिघाडी?

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत मोठा हाय व्हॉल्टेज ड्रामा होत असून, शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानेही धुळे येथील महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली असून, त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा उमेदवारीवरून महायुतीत बेबनाव झाला असून, नाशिक शिक्षक मतदार संघाची ही जागा शिवसेनेची असून आम्ही अजित दादांच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here