Teachers and Graduates Election | २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून, लोकसभा निवडणुकीने या निवडणुकांच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. मात्र, ही निवडणूक संपते तोच आता पुढील निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक पार पडणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे.
यानुसार, मुंबई, नाशिक व कोकण विभागात १० जून रोजी मतदान होतंणार आहे. मुंबई व कोकण पदवीधर मतदार संघ तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, चार आमदारांचा कार्यकाळ हा ७ जुलै रोजी संपणार असल्याने विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांवर १० जून रोजी मतदान होणार आहे.
विधान परिषदेत ७ सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून तर ७ सदस्य हे पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान, दोन पदवीधर व दोन शिक्षक मतदार संघातील चार आमदारांचा कार्यकाळ हा ७ जुलैला संपणार असून, यामुळे रिक्त होणाऱ्या या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख जाहीर केली आहे. या कार्यक्रमानुसार या मतदार संघांत १० जूनला मतदान होईल आणि १३ जूनला मतमोजणी होणार आहे.
Loksabha Election | लोकसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती
Teachers and Graduates Election | अशी आहे निवडणूक प्रक्रिया?
यासाठी निवडणुकीची प्रक्रिया ही १५ मे पासून सुरू होणार असून, २२ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करनेची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी ही २४ मे रोजी होईल आणि २७ मे पर्यंत अर्ज मागे घेता येईल. १० जून रोजी मतदान होईल आणि १३ जूनला मतमोजणी होणार आहे.
‘या’ आमदारांचा कार्यकाळ संपणार?
- विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर मतदार संघ
- निरंजन वसंत देवखरे – कोकण पदवीधर मतदार संघ
- किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक मतदार संघ
- कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक मतदार संघ
Chhagan Bhujbal | प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; गोडसेंना तारण्यासाठी मुख्यमंत्री नाशकात..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम