Political news : आणि म्हणून त्या कार्यकर्त्याने गोंदवला मुनगंटीवारांचा टॅटू…

0
37

Sudhir mumgantivar : हातावर थेट सुधीर मुनगंटीवार यांचे चित्र करून त्याचा अनावरणही केलं चंद्रपूर मधील एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या नेत्यावरील असलेली निष्ठा चर्चेचा विषय ठरत आहे.

 

सध्या राज्यभरातील या ट्रिपल इंजिनच्या सरकारची चर्चा सुरू आहे. घडत असलेल्या घडामोडी यामुळे राज्यातील राजकारण सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षांतर्गत होणारी बंडखोरी यामुळे नेमका विश्वास कुणावर ठेवावा असा पेच पक्षप्रमुखांसमोर निर्माण झाला आहे. खांद्याला खांदे लावून अनेक वर्ष सोबत काम करणाऱ्यांना देखील संशयी नजरेने बघितलं जात आहे. यातच आपल्या नेत्याप्रती निष्ठा दाखवून देण्यासाठी चंद्रपूर मधील एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या हातावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चित्र गोंदवून घेतलं आणि त्या चित्राचं अनावरण देखील केल आहे. काशिनाथ सिंह असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर येथील भाजपचे ते शहर अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्रातील चंद्रपूर मध्ये भाजप कार्यकर्ता काशिनाथ सिंह यांनी हातावर चित्र गोंदवून घेत आपली निष्ठा दाखवून दिली. एकीकडे राज्यातील राजकीय पक्षांतर्गत सुरू असलेलं बंडखोरीचे राजकारण आणि दुसरीकडे आपल्या नेत्यावरील प्रेम आणि निष्ठेची आपल्या कृतीतून दाखवून दिलेली प्रचिती, यामुळे या भाजप कार्यकर्त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. अनेक जण हातावर टॅटू गोंदवून घेतात आपल्या आवडतं डिझाईन जवळच्या व्यक्तीचं नाव टॅटू म्हणून आपल्या शरीराच्या अवयवांवर गोंदवून घेतलं जातं. मात्र या कार्यकर्त्याने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चित्र हातावर गोंदवल आहे.

दरम्यान आता हा टॅटू आयुष्यभर त्यांच्या हातावर राहणारे काशिनाथ सिंह यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिरात प्रार्थना करताना या टॅटूचं अनावरण देखील केलं यावेळी भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here