Tamilnadu Bus Accident :तामिळनाडूमध्ये प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

0
51

Tamilnadu Bus Accident: तामिळनाडूमधून भीषण बस अपघाताची माहीती समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी  मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी प्रवास करत होते. एएनआय (ANI)या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने ही बस जात असताना ही दुदैवी घटना घडली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्नूरमधील मारापलमजवळ दरीमध्ये ही बस कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

प्राथमिक माहीतीनुसार बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं आहे. या अपघातात मृत पावलेल्या लोकांमध्ये  3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असुन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी जाहीर केलेली आहे.तर PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना  2 लाख रुपये आणि जखमींना 50  हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Tamilnadu Bus Accident)

Mumbai Local Train : संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत दिवा स्थानकात केला रेलरोको

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं असून मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. तर जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असं X वर पोस्ट करण्यात आली आहे.

तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मी प्रार्थना करतो की जखमी लवकर बरे व्हावेत. प्रत्येक मृतांच्या वारसांना पीएमएनआरएफमधून दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. — PMO India (@PMOIndia)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here