Mumbai Local Train : संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत दिवा स्थानकात केला रेलरोको

0
22

ठाणे : Mumbai Local Train | मुंबई मध्य रेल्वेमार्गावरील दिवा स्थानकावर रविवारी सकाळी कोकणात जाणारे प्रवाशी प्रंचड संतापलेले पहायला मिळाले. या संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन मुंबई मध्य रेल्वेची पूर्ण रेल्वे वाहतुक रोखून धरली होती. आज सकाळची दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अनेक तास स्थानकावर आली नाही. तसेच रेल्वे प्रशासनाकडूनदेखील  याबाबत काहीही माहिती दिली जात नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन रेल्वे वाहतुक रोखून धरली. या प्रवाशांनी १, २ आणि ३ या रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ठप्प झाली होती.रेल्वे पोलिस खुपवेळ या प्रवाशांची समजूत काढत असताना  अखेर तब्बल पाऊणतास गोंधळाच्या परिस्थितीनंतर दिवा स्थानकावरील प्रवाशी ट्रॅकवरुन बाजूला झाले आहेत. मात्र, या सर्व गोंधळामुळे मध्य रेल्वेच्या दिवसभरातील उर्वरीत  वेळापत्रकाचेही तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune PMPML Bus | पुणे बससेवेत प्रवाशांसाठी नवीन सुविधा, प्रवाशांची काळजी मिटली

काल पनवेलजवळ रेल्वे ट्रॅकवर मालगाडी घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले होते. याचाच परिणाम आज सकाळीही रेल्वे वाहतुकीवर जाणवत होता. यामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेएक्स्प्रेस अनेक तासांच्या विलंबाने धावत आहेत. मध्यरात्री सीएसएमटीवरुन (CSMT) सुटलेली तुतारी एक्स्प्रेस हि रात्री तीन वाजता दिवा स्थानकाजवळ थांबली होती. तेव्हापासून तुतारी एक्स्प्रेस एकाच जागी थांबून आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसमध्ये अनेक प्रवासी हे अडकून पडले आहेत. रेल्वेप्रशासनाकडून कोणतीही सूचना दिली जात नसल्याने प्रवाशी नाराज झालेले आहेत.

श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा – शिंदे

तर दिवा पॅसेंजर हि रेल्वेगाडी पहाटे 6;45वाजता दिवा स्थानकात येत असते. परंतु, अनेक तास उलटूनदेखील हि रेल्वेगाडी स्थानकातआलीच नव्हती. यातच वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी या एक्स्प्रेस कल्याण आणि कर्जतमार्गे वळवण्यात आल्या. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा अजुनच उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं आणि या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन संपूर्ण रेल्वेवाहतूक रोखून धरली होती.Mumbai Local Train


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here