Skip to content

आलिया भट्टनंतर बिपाशा कडून गोड बातमी….


द पॉइंट नाउ प्रतिनिधी : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने आई झाल्याची गोड बातमी दिल्यानंतर आता बिपाशा बासू देखील तिच्या बाळासाठी आतुर झाली आहे. बिपाशाने बेबी बंप फ्लॉन्ट करता वेळेसचा एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बिपाशा आणि करण ग्रोव्हरच्या ह्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतल आहे.

बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक अभिनेत्रीनकडून गोड बातमी चाहत्यांना देण्यात आली आहे. प्रियांका चोप्राची मुलगी मालती आणि सोनम कपूरने वायू याला जन्म दिला आहे.

नंतर आलियाने रविवारी ६ नोव्हेंबरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याची गोडबतमी चाहत्यांनासोबत शेअर केली आहे. आलियानंतर बिपाशा ही देखील बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहे. बिपाशा आणि करण ग्रोव्हरने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशा बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचे दिसत आहे. करण ग्रोव्हर हा बिपाशाला व्हिडीओमध्ये डान्ससाठी कंपनी देत असल्याचे दिसत आहे. “मला जेमतेम हालचाल करता येत आहे”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओ पोस्टला दिलं आहे.

बिपाशाच्या या व्हिडीओमध्ये ‘बेबी ऑन द वे’ असं लिहलेलं देखील दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट करत बाळाच्या आगमनासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे. बिपाशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही नुकताच पार पडला असून सेलिब्रिटींनीही या सोहळ्यास हजेरी लावली होती.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!