Sushma Andhare | ‘चार आणे, बार आणे अटक करा नारायण राणे’; राणेंच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक

0
75

Sushma Andhare : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात समुद्रकिनारी असलेला राजकोट किल्ल्यावर काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती असलेला पंचधातूंचा पुतळा उभारण्यात आला होता. ज्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला यावरून महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्येच काल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून किल्ल्याची पाहणी करत असताना आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामध्ये झालेला वाद आणि त्यानंतर नारायण राणेंनी केलेले खळबळजनक वक्तव्य यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संपूर्ण प्रकरणाबाबतचे पुरावे दाखवत राणेंना अटक करा अशी मागणी करत पुण्यामध्ये जोरदार आंदोलन केले आहे.

Rajkot Fort | ठाकरे ठाण मांडून, राणेही मागे हटायला तयार नाही; राजकोट किल्ल्यावर तूफान राडा

“महाराजांच्या गडांचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही” – सुषमा अंधारे

काल मालवणयेथील राजकोट किल्ल्यावर झालेल्या प्रकरणानंतर नारायण राणे यांनी केलेल्या “तुम्ही इथे यायचे नाही” या वक्तव्याला खोडून काढत “छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा सातबारा नारायण राणे यांच्या बापाचा नाहीये.’ असं म्हणत नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. त्याचबरोबर नारायण राणे यांनी कोकणामध्ये कशाप्रकारे गुंडगिरी करत सत्ता मिळवली आहे याच्या पुराव्यांचे पाढे वाचले. त्यामुळे “अशा मुजोरीची भाषा वापरणाऱ्या बाप लेकांना तुम्ही कधी अटक करणार?” असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला.

Indian Navy | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नौदलाकडून चौकशी समितीची नेमणूक

“नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचा नेमका संबंध काय?” सुषमा अंधारेंचा सवाल

त्याचबरोबर “छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती असलेला मालवण येथील पुतळा ज्याने बनवला तो जयदीप आपटे आणि नितेश राणे यांच्यामध्ये मैत्री आहे आणि त्याचमुळे त्याला कसलाही अनुभव नसताना एवढ्या मोठ्या कामाची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर “छत्रपती शिवरायांचा पंचधातूंनी बनवलेला हा पुतळा मुद्दाम विकृत बनवण्याचे काम भाजपने आणि विकृत मनुवादी सनातनच्या लोकांनी काय पद्धतीने केला. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.” अशी मागणी देखील अंधाऱ्यांकडून यावेळी करण्यात आली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here