Surat | देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, यामुळे सगळीकडे प्रचाराचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरले जात असून, पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियाही पार पडली आहे. सत्ताधारी भाजपने यावेळी ‘400 पार’ चा नारा लगावला आहे. दरम्यान, या 400 पैकी पहिल्या जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. विरोधी उमेदवाराने माघार घेतल्याने या पहिल्या जागेवर भाजपचा विजय झाला आहे.
सर्व विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला असून, प्रमुख विरोधी उमेदवाराचाच उमेदवारी अर्जच बाद झाल्याने दलाल यांचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या कुम्भानी यांचाच अर्ज रद्द झाल्याने या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असून, या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
BJP Manifesto | मोदींच्या ११ मोठ्या घोषणा; मोफत रेशन आणि उपचार
Surat | प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले
दलाल यांच्या विजयाने भाजपच्या विजयाचे खाते उघडले असून, सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली असून, विशेष म्हणजे त्यांना आज खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दलाल हे प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले आहेत.
काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज का रद्द..?
सुरतमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेस उमेदवार निलेश कुम्भानी यांच्या उमेदवारीच्या अर्जावर असलेल्या तीन सूचकांच्या हस्ताक्षरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एवढंच नाहीतर, विशेष म्हणजे कुम्भानी यांच्या उमेदवारी अर्जावर असलेल्या सह्या या आमच्या नाहीत, असंही या सूचकांनी सांगितलं होतं. त्यानंतर दिनेश जोधानी यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यामुळे कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आला आणि दलाल यांचा विजय झाला आहे.
BJP | काय सांगता..! चोरांनी भाजप अध्यक्षांचीच फॉर्च्युनर कार चोरली
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम