सुराणा पतसंस्थेस २ कोटी ३३ लाखाचा नफा- अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा

0
3

देवळा: येथील श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च अखेर विक्रमी २ कोटी ३७ लाख ८० हजार इतका डोबळ नफा झाला असून घसारा व विविध प्रकारच्या तरतुदी वजाजाता संस्थेस १ कोटी १७ लाख ५२ हजार इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा व उपाध्यक्ष डॉ जगदीश धामणे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती देतांना डॉ रमणलाल सुराणा यांनी सांगितले की, संस्थेचे अधिकृत भागभांडवल २ कोटी ५० लाख असून वसूल झालेले भागभांडवल २ कोटी १० लाख ४२ हजार आहे. संस्थेकडे विविध प्रकारचा १९ कोटी ८० लाखाचा निधी जमा असून जमा असलेला निधी संस्थेचा पाया किती भक्कम आहे हे दर्शवितो. संस्थेच्या ठेवी ५० कोटी १० लाख , कर्जवाटप ३१ कोटी ७१ लाख ५१ हजार इतके असून आर्थिक वर्षात कर्जवाटपात २ कोटी ४४ लाख ६० हजार इतकी भरघोस वाढ झाली आहे. संस्थेने बँकांमध्ये व सेंट्रल गर्व्हमेंट सिक्युरीटीमध्ये ३८ कोटी ४४ लाख ७५ हजार गुंतवणूक केली आहे. तसेच मार्च २०२३ अखेर नेट एनपीए ०% असून निव्वळ थकबाकी ३.७५% इतकी आहे.

गेली २७ वर्षापासून संस्थेचे संचालक मंडळ निस्वार्थीपणे कार्यरत असून ठेवीदारांचा व कर्जदारांचा दृढ विश्वास संस्थेवर आहे. पारदर्शी कारभार, तत्पर व विनम्र सेवा देण्यासाठी संस्था जिल्हाभर ओळखली जाते. सोनेचांदी व्यवहारासाठी ग्राहक संपूर्ण जिल्ह्यातून येत असतात, अतिशय पारदर्शी व्यवहार, कधी गडबड घोटाळा झाला नाही व होणार नाही याची ग्वाही डॉ सुराणा यांनी दिली. भक्कम पायावरती उभी असलेली सुराणा पतसंस्था आर्थिक आघडीवर अग्रेसर तर आहेच शिवाय प्रत्येक सामाजिक कार्यात ही पतसंस्था आघाडीवर असते. गोर गरिबांची दुखे: जाणून घेणे व त्यांना शक्य तेवढी मदत तसेच संरक्षण दलातील शहीद जवानांच्या वीर पत्नीस आर्थिक मदत करणे आदी कामात संस्था अग्रेसर आहे. सुजज्ज अशी स्वमालकीची भव्य इमारत, मनमिळाऊ कर्मचारी वर्ग ही तर पतसंस्थेची विशेषतः आहे. पतसंस्थेने सभासदांना वेळोवेळी सुंदर, दैनंदिन उपयोगी अशा भेटवस्तुंचे वाटप केले आहे . संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे एक प्रकारचा सन्हेमेळावा असतो . अशा अनेक वैशिष्ठनी परिपूर्ण सुराणा पतसंस्था राज्याला आदर्श ठरावी अशी आहे. संस्थेने नुकताच सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या पदानुसार १० लाखापासून ते ५० लाखाचा टाटा AIA लाईफ इन्सुरन्स कंपनी यांचा विमा कर्मचारी कल्याण योजनेतून उतरविला आहे.

यावेळी संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा, संचालक प्रदिप सुराणा, रमेश संकलेचा, हरकचंद ओस्तवाल, ईश्वर सुराणा, धरमचंद संचेती, सुभाष सोनवणे, राजेंद्र सुराणा, डॉ भुषण कर्नावट, जर्नादन शिवदे, संजय कानडे, संचालिका सुरेखा सुराणा आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here