नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा – सर्वोच्च न्यायालय


दिल्ली – प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माला संपूर्ण देशाची टीव्हीवर माफी मागण्यास सांगितले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतासह संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला.

तसेच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनाही फटकारले. नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये पहिल्यांदा एफआयआर नोंदवण्यात आला. मग, त्याविरोधात तुम्ही का कारवाई केली नाही, असा सवाल कोर्टाने केला.

कोण आहेत नूपुर शर्मा?

नुपूर शर्मा या मूळच्या दिल्ली येथील आहेत. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९८५ रोजी नवी दिल्लीत झाला. नुपूर शर्मा ह्या कॉलेज काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिकिटावर त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षही झाल्या आहेत. २०१५ मध्ये नुपूर शर्मा यांना भाजपच्या प्रवक्त्या बनवण्यात आले होते. त्या व्यवसायाने वकील आहेत. नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे देश व जगभरात संतापाची लाट उसळली होती. नंतर भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!