Political : एकनाथ शिंदें नंतर आता राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन रविवारी अजित पवार यांनी आपल्या नऊ जणांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलेली असतानाच आता सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त केले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केल आहे. (Political)
Gadchiroli : गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यासाठी राष्ट्रपती राहणार उपस्थित…
रविवारच्या शपथविधीनंतर राज्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी आज सायंकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेत अजित पवार यांची गटनेतेपदी तर अनिल पाटील यांची प्रतोद पदी नियुक्ती केली आहे. पक्षाने मला अधिकृत रीतीने कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी २०२२ सप्टेंबर मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो. (Political)
जयंत पाटील यांची नियुक्ती आम्हीच केली होती. संघटनात्मक निवडणूक त्यावेळी झाली नव्हती तरीही त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली यामुळे आता आम्ही जयंत पाटलांना जबाबदारी मधून मुक्त करत असून त्यांच्या ऐवजी सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत असं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल आहे. (Political)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम