Sunetra Pawar Rajya Sabha | दादांचं ठरलंय..! पत्नीला खासदार बनवणारच; घेतला ‘हा’ मोठा निर्णय..?

0
55
Sunetra Pawar Rajya Sabha
Sunetra Pawar Rajya Sabha

Sunetra Pawar Rajya Sabha |  लोकसभा निवडणुकीत अनेक मतदार संघांमध्ये हाय व्हॉल्टेज लढती पहायला मिळाल्या. यात देशाचे लक्ष असलेल्या बारामतीच्या लढतीकडे होते. या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगलेली होती. तसेच शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. मात्र, या लढाईत मोठ्या पवारांनी बाजी मारली आणि पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तर ही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला. तर, अजित पवार (Ajit Pawar) गटाचा केवळ एक उमेदवार निवडून आला.

मात्र, यामुळे पक्षात अंतर्गत धुसफूस वाढली आणि आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. एवढेच नाहीतर केंद्रीय मंत्रीमंडळातही सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा होती. पण तेथेही अजित पवार गटाला मंत्रीपद मिळाले नाही. यामुळे पक्षातील नेते आणखी नाराज झाले. दरम्यान, अनेक दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू होती. बारामतीतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी पुणे आणि काटेवाडी येथील अजित पवारांच्या समर्थकांनी केली होती. (Sunetra Pawar Rajya Sabha)

Baramati Lok Sabha | बारामती शरद पवारांचीच; दादा पत्नीलाही निवडणून आणण्यात अपयशी

Sunetra Pawar Rajya Sabha | नाराजी ओढवून पत्नीलाच दिली उमेदवारी 

प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर ही प्रक्रिया पार पडणार असून, या जागेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहीती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे हे इच्छुक असून, यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यातून अजित पवार यांनी घराणेशाहीच्या टिका, आरोप स्वीकारुन आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून आपल्या पत्नीलाच राज्यसभेवर  (Rajya Sabha Election 2024) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  (Sunetra Pawar Rajya Sabha)

Sunetra Pawar | बायकोला निवडून द्या, तुम्हाला माझाही फायदा; कारण बायको म्हणाली, “अहो…”

आज करणार उमेदवारी अर्ज दाखल..?

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव फायनल करण्यात आले. तर, आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही अजित पवारांची खेळी आहे..? की आपला पराभव लपवण्याचा आणि पक्षातील अंतर्गत धुसफूस मिटवण्याचा प्रयत्न हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Sunetra Pawar Rajya Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here