Skip to content

Suicide news : डोकेदुखी असह्य झाल्याने तिने घेतला गळफास


Suicide news : डोकेदुखीच्या वेदना सहन होत नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणीने घरातील फॅनला ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर मधील हर्सूल सावंगी परिसरात हा प्रकार घडला आहे.

प्रिया रमेश बुजडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून मयत तरुणीचे डोके दुखत होते. यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू करण्यात आले होते. मात्र त्यातून देखील तिला फरक जाणवला नाही. डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्याने प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

https://thepointnow.in/suicide-news/

प्रियाच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी प्रियाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदना साठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करत आहे. माझी डोकेदुखी आता असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असे तिने चिठ्ठीत नमुद केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!