Sudhakar Badgujar | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे, आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दहशतवादी कारवाया करणारा आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत जवळीक साधत पार्टी केल्याचे आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी त्यांनी बडगुजर यांच्या त्या कथित पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ थेट विधानसभेत दाखवले होते.
दरम्यान, या प्रकरणी काल बडगुजर यांची तब्बल तीन तास चौकशीदेखील सुरू होती. आणि त्यातच आज त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पदाचा गैरवापर केल्याची तक्रार याआधी दाखल होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Trimbakeshwar | अधिकारी-मंत्र्यांनीच आता सिंहस्थाचे शाहीस्नान करावे; साधू-महंत भडकले
अधिक माहितीनुसार, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. सन २०१६ मध्ये सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत कंपनीला ठेका दिल्याची तक्रार होती आणि आता त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, आता एकीकडे आरोपी सलीम कुत्ता ह्या गाजलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु असून, त्यातच आता बडगुजर यांच्यावर एसीबीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर सुधाकर बडगुजर यांनी यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की, “मला या संदर्भात कसलीही माहिती नाही. आणि आता यापुढे काय करायचं ते आम्ही कायदेशीररित्या पाहून घेऊ”. सध्या सलीम कुत्ता पार्टी ह्या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असताना त्यातच आता ह्या गुन्ह्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, हे सर्व सूडापोटी केले जात आहे का? अशीही चर्चा सुरू आहे.
Nashik Breaking | नाशकात बडगुजर यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक
बडगुजरांचं स्पष्टीकरण | (Sudhakar Badgujar)
भाजप आमदार नितेश राणे यांनी कुठलीही योग्य माहिती न घेता आपल्यावर आरोप केल्याचा दावा यावेळी सुधाकर बडगुजरांनी केला आहे. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा तसेच मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याचे आरोप आमदार नितेश राणे यांनी केले आहेत.
यावर उत्तर देताना सुधाकर बडगुजर म्हणाले, “आमची ही भेट जाणीवपूर्वक झालेली नसून, कोणत्या तरी सार्वजनिक ठिकाणी यावेळी आमची ही भेट झालेली असू शकते किंवा कथित व्हिडिओ हा मॉर्फिंग ही असू शकतो”, आम्ही या प्रकरणी पोलिसांना तपासाबाबत सर्व प्रकरचे सहकार्य करु.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम