Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात

0
13
#image_title

Nashik Politics | विधानसभा निवडणुका तोंडावर असताना नाशिकमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. दोन वर्षांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गोळीबार घडवून आणण्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात असून सुधाकर बडगुजर यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

यापूर्वीही बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी करतानाचे फोटो, व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात दाखवले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर हे चांगलेच चर्चेत आले होते. अवढेच नाहीतर लाचलुचपत विभागाकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, दोन वर्ष जुन्या गोळीबार प्रकरणी त्यांच्या मुलाचे नाव समोर आले आहे.

Nashik Crime | बडगुजरांचा मुलगा फरार; ‘त्या’ प्रकरणी मुलाला अटक होणार…?

नेमकं प्रकरण काय?

प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दिपक बडगुजर यांचे नाव समोर आल्याने राज्याचे राजकारण तापले असून, सत्ताधाऱ्यांकडून बडगुजर आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केले जात आहेत. यावरुन पक्षाच्या महिला आघाडीने जोरदार निदर्शनं  करण्यास सुरूवात केली असून महिला आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंबड पोलिसांवरच आरोपांच्या फैरी झडायला सुरुवात केली आहे. तर, खासदार संजाय राऊत यांनीही या प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

प्रशांत जाधव वर अनेक गुन्हे दाखल

गोळीबार प्रकरणातील माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे आरोप महिला आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे फिर्यादीवरच खंडणी आणि वसुलीचे गुन्हे दाखल असल्यामुळे तेच संशयाच्या भोवऱ्यात आहे. गोळीबार प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी जाधव यांच्या बरोबर मिळून शहरात खंडणी वसूल करतात. असे गंभीर आरोप शिवसेनेच्या महिला आघाडी करून करण्यात आले आहे.

Nashik Crime | बडगुजरांच्या अडचणीत वाढ; २ वर्ष जुन्या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल

तपासासाठी बोलावलेल्या संशयीतांकडून वसुली

एमडी ड्रग्स प्रकरणात खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करून संशयीतांना तपासासाठी बोलवण्यात आले आणि त्यांच्याकडूनही वसुली केली गेली. असा आरोप यावेळी महिला नेत्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे देखील जाहीर केली आहेत. सुधाकर बडगुजर यांना या प्रकरणात गोवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट चांगलाच सक्रिय झाला असून याबाबत पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांवर टीका केली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here