Sudhakar Badgujar | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळाच्या टार्गेटवर असलेलं नाव म्हणजे सुधाकर बडगुजर(Sudhakar Badgujar). काही दिवसांपूर्वी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे आणि त्या पार्टीमध्ये ‘मे हू डॉन’ ह्या गाण्यावर थिरकतानाचे व्हिडिओ व फोटो दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले व ह्या आतंकवाद्यांसोबत मिळून बडगुजर यांना नाशिकमध्ये काही घडवायचे आहे का? असा प्रश्न करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती.
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंचा करेक्ट कार्यक्रम राजकीय सुडापोटी की कर्माने ?; वाचा सविस्तर
त्यामुळे राज्याच्या राजकारणाला ढवळून काढणारे हे नाव आणि प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, ह्याच सुधाकर बडगुजर यांच्यावर आता आणखी एका प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदाचा गैरवापर केल्याचा हा गुन्हा त्यांच्यावर एसीबी कडून ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधीही नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांची तब्बल चार तास चौकशी सुरू होती. आणि त्यात काल त्यांच्यावर आणखी एक ठपका ठेवण्यात आला. दरम्यान, आज यावर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते अतिशय आक्रमक भाषेत म्हणाले की, “जर ह्या अॅंटी करप्शन विभागाने माझ्यावर केले आरोप सिद्ध झालेत. तर, मी आधिक्षकांच्या दालनात गळफास घेत आत्महत्या करेल. पोलिस आणि अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली कारवाई करू नये, सर्व काही नियमातच करावे. अशी प्रतिक्रिया यावेळी सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. (Sudhakar Badgujar)
Sudhakar Badgujar | बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शिवसेनेतर्फे जोडे मारो
नेमकं प्रकरण काय..? |(Sudhakar Badgujar)
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये बडगुजर यांच्या विरोधातील हा गुन्हा दाखल झाला आहे. २०१६ मध्ये सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्याकडे असलेल्या पदाचा गैरवापर करत एका कंपनीला ठेका दिल्याची त्यांच्या विरोधात तक्रार होती. पण, आता त्यांच्यावर या प्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांची चौकशी सुरू असून दरम्यान, एकीकडे आरोपी सलीम कुत्ता ह्या प्रकरणाची चौकशी सुरु असून, आता दुसरीकडे आता बडगुजर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हादेखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम