Dhule – धुळ्यात पाणीप्रश्न पेटला…..

0
13

Dhule : धुळे शहरातील जनतेला तब्बल 15 ते 20 दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून धुळ्यामध्ये अनेक आंदोलन केली गेली तर अनेक मोर्चे काढण्यात आले. यात प्रत्येक वेळी महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या वतीने फक्त आंदोलकांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. मात्र कोणतीही ठोस अंमलबजावणी करून धुळ्यातील जनतेला पाणीपुरवठा नियमित केला जात नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामान्य जनतेने आज पुन्हा एकदा धुळे महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. आणि धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा होईल यासाठी काटेकोर नियोजन करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशी मागणी करण्यात आली.

 

गेल्या चार महिन्यांमध्ये धुळे शहरात असंख्य आंदोलन, मोर्चे पाण्यासाठी करण्यात आले. धुळ्यामध्ये जवळपास पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना वापरण्यासाठीच नाही तर पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाहीये. यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेने कराव तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने आता तरी या मुद्द्याकडे गांभीर्याने बघून या हतबल जनतेला या जाचातून मुक्त करावं अशी मागणी आता जोर धरत आहे. तर पंधरा दिवसात यावर कुठला तोडगा निघणार का? की धुळेकरांना आंदोलन आणखी तीव्र करावं लागणार हे बघणं आता अधिकच महत्त्वाचे ठरणार आहे.

 

यावेळी मोठ्या संख्येने गृहिणी रिकामे हांडे घेऊन महापालिकेच्या द्वारावर येऊन ठेपल्या पातळी यावेळी सत्ताधारी भाजपने पोलीस बाळाचा वापर करून आपल्याला महापालिका आयुक्तांना भेटू न दिल्याचा आरोप करत येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करून दिलं नाही तर दररोजच महापालिकेवर तीव्र स्वरूपाच आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला आहे.

आंदोलक महिला

धुळे महापालिका आणि शहरावर भाजपची सत्ता आहे धुळ्यामध्ये आमदार खासदार आणि महापालिकेमध्ये महापौर देखील भाजपचा आहे. निवडणुकांमध्ये दोन दिवसाआड धुळेकर जनतेला पाणी देऊ अस आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्या आश्वासन पूर्ण केलं जात नाहीये. सत्ताधाऱ्यांनी यावर लवकर कारवाई करावी अन्यथा आपण जनतेची फसवणूक करत आहोत असं जाहीर करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here