शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धुळे शहरात खोके दिवस व गद्दार दिवस म्हणून साजरा केला.
मागील वर्षी आजच्या दिवशी राज्यांमध्ये मोठं राजकीय भूकंपाला होता शिवसेना पक्षामध्ये असलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिवसेने विरोधात बंड पुकारलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी पुतळा येथे आंदोलन केलं. यावेळी घोषणा देऊन गद्दारीचा व खोक्यांचा निषेध करण्यात आला.
जनतेच्या मनात असणारे लोकप्रिय ठाकरे सरकार रात्रीच्या वेळेस गद्दारी करून पाडण्यात आले. सुरत,गुवाहाटी,गोवा मार्गे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान त्यावेळी शिंदे सरकाने केला आहे.याचा निषेध म्हणून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन व घोषणा देऊन त्यांचा धिक्कार व निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी “50 ओके, एकदम ओके” “महाराष्ट्र त्रस्त,गद्दार मस्त” “खाऊन खोके, माजलेत बोके” “गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाओ” अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. .
शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज 20 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खोके वीरांच्या वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिवस खोके दिवस मनवीत आहे.
रणजित राजे भोसले – शहराध्यक्ष – राष्ट्रवादी
तर दुसरीकडे धुळे शहरातील महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पाणीपुरवठा होत नसल्याने त्रस्त असलेल्या जनतेला सोबत घेऊन महापालिकेवर हंडा मोर्चा काढला यामुळे आज धुळेकरांसाठी मंगळवार हा मोर्चा वार ठरला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम