नाशिक – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे येत्या फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले.
संभाव्य वेळापत्रकानुसार २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार असून २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पाडणार आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ह्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे. तसेच अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा व्हाट्सअॅप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
तसेच प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळविण्यात येणार आहे, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाईट : https://www.mahahsscboard.in/
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम