Spiritual news | असे आहे कालभैरव जयंतीचे महत्त्व; वाचा सविस्तर

0
10

Spiritual news |  भगवान शंकराच्या रौद्र रूपात भगवान काल भैरव (Kaal Bhairav)देवाची पूजा केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष किंवा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ह्या तिथीला कालभैरवाची पूजा करुन कालभैरव जयंती ही साजरी केली जाते. कालभैरवाचा जन्म हा क्रोधातून झाला, म्हणून तो शंकराचा रुद्र अवतार मानला जातो. देवाच्या ह्या शिवरूपाची पूजा केल्याने भय तसेच शत्रूपासून मुक्ती मिळते व संकटांपासूनही मुक्ती मिळते.

यावर्षी काल भैरव जयंती ही मंगळवार, (दि. ५ डिसेंबर २०२३) रोजी असून, हिंदू धर्मानुसार यादिवशी कालभैरवाची उपासना केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. कालभैरव (Kaal Bhairav)हे अफाट शक्तींचे देवता आहेत, असेही शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे त्यांची पूजा केल्यामुळे अकाली मृत्यूची भीतीदेखील दूर होते. पण तुम्हाला माहित आहे का, कालभैरवचा जन्म हा कसा झाला व त्याचा भगवान शंकराशी काय संबंध आहे? चला तर मग हे जाणून घेऊयात.

Big News | राज्यात डुप्लीकेट मनोज जरांगे; डुप्लीकेट जरांगेंचा मराठा आंदोलनास पाठिंबा की…

अशी आहे काल भैरवाची जन्मकथा 

भगवान कालभैरवाच्या जन्माशी संबंधित पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शिव, ब्रह्मा व विष्णू यांच्यात ‘तिघांत श्रेष्ठ कोण?’ यावरून वाद झाला होता. वाद व चर्चा होऊनदेखील तोडगा निघू न शकल्याने, त्यांनी एक सभा बोलावून सर्व देवांना विचारले की, ‘आम्हा तिघांमध्ये श्रेष्ठ कोण?’ सर्व देवतांनी आपापले विचार मांडले. व त्यानंतर झालेल्या निष्कर्षाने भगवान विष्णू व शिव हे प्रसन्न झाले. पण, ब्रह्मदेव हे असमाधानी झालेत.

ब्रम्हदेवांनी रागात भगवान शंकराबद्दल वाईट बोलले. सर्व देवतांनी स्तुती केल्यानंतर ब्रह्मदेवाकडून असे अपमानास्पद वक्तव्य ऐकल्याने झालेला अपमान हा भगवान शंकरांना सहन झाला नाही व त्यांनाही राग आला आणि या रागातूनच भगवान शंकरांच्या कालभैरव ह्या अवताराचा जन्म झाला. भगवान शिवाच्या ह्या रुद्र अवताराला महाकालेश्वर (Kaal Bhairav)असेही म्हणटले जाते. भगवान शंकराचे हे उग्र रूप पाहून सर्वजण घाबरले व सर्व देवतांनी त्यांना शांत राहण्यासाठी विनंती केली.

पण रागात कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक छाटले. या घटनेमुळे ब्रह्मदेवाला चार मुख आहेत.  असे सांगितले जाते. पण या आधी त्यांना पाच मस्तक होते. ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापल्यामुळे कालभैरव देवांवरही ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप लागले. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने शिवाच्या या रुद्र अवताराची क्षमा मागितली. आणि त्यानंतर ते शांत झालेत. पण, ब्रह्मदेवाच्या हत्येच्या ह्या पापामुळे कालभैरवांना शिक्षा भोगावी लागली व अनेक वर्षे भिकाऱ्याच्या रूपात त्यांना पृथ्वीवर भटकावे लागले. शेवटी त्यांची शिक्षा वाराणसीमध्ये संपली. म्हणूनच कालभैरवाला दंडपाणी असेही नाव पडले.

Jalna | आंतरवाली सराटीत आजपासून ओबीसींचे उपोषण


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here