Special Story | शहर अन् गावाच्या नावापुढे ‘पूर’ का लिहिलं जातं?

0
56

Special Story | भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक असून भारताचा एतिहास सुद्धा मोठा आहे. याच इतिहासाशी संबंधित अनेक गोष्टी शहर किंवा गावात दिसून येत असतात. इतकंच नाही तर अनेक शहर आणि गावांच्या नावाच्या मागे सुद्धा काही इतिहास दडलेला असतो. आजवर भारतातील अनेक गावे किंवा शहरांच्या नावापुढे ‘पूर’ असं लिहिलेलं तुम्हाला दिसून आलं असेल. यात उदयपूर, जयपूर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, जयपूर, उधमपूर अशा नावांचा समावेश आहे. मात्र या नावांच्या पुढे पूर का लिहिण्यात येतं? याचा नेमका अर्थ काय आहे? जाणून घेऊयात या संदर्भात अधिक तपशील..Special Story
भारत हा विविधतेने नटलेला देश असून भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, वारसा, इतिहास आपल्याला पहायला मिळतो. भारतातील प्रत्येक शहराला अनेक वर्षांचा त्या शहराचा स्वतंत्र इतिहास आहे. इतकेच नाही तर या शहरांच्या नावामागे सुद्धा इतिहास असतो आणि भारतातील अनेक शहरांच्या आणि गावांच्या नावापुढे ‘पूर’ लिहिलेलं आपल्याला दिसूनदेखील येतं. Special Story

कसं जोडलं गेलं ‘पूर’ हे नाव?

प्राचीन काळापासून शहरांच्या किंवा गावांच्या नावापुढे पूर नावाचा उल्लेख केला जात असून प्राचीन काळी अनेक राजे, महाराजे आणि सम्राट यांनी आपल्या नावांच्या पुढे शहरांची नावे जोडली होती. जसे की, जयपूर शहराची निर्मिती राजा जयसिंह यांनी केली होती आणि त्यामुळेच त्यांच्या नावाच्या पुढे पूर जोडून जयपूर नाव ठेवण्यात आलेले होते.

‘पूर’ याचा नक्की अर्थ काय?

पूर या शब्दाचा उल्लेख ऋग्वेदात सुद्धा करण्यात आलेला असून हा एक प्राचीन संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ शहर किंवा किल्ला होय. प्राचीन काळात राजा-महाराजांची वेगवेगळ्या शहरांमध्ये आपले स्वत:चे राज्य असायचे आणि त्यामुळे आपल्या राज्याचे नाव ठेवण्यासाठी काही राजे आणि सम्राटांनी आपल्या नावासोबत किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या नावासोबत पूर हा शब्द वापरण्यास सुरुवात केली होती. त्याकाळी एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला विशिष्ट नाव ठेवले जात होते आणि शब्दाच्या शेवटी पूर शब्द जोडण्यात येत होते आणि यामुळे त्या जागेला ते नाव ठेवले जात होते.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here