Solapur University | सरकारी शाळांमधील भोंगळ कारभार हे अनेकदा समोर येत असतात. कधी शिक्षकांना इंग्रजीच वाचता येत नाही. तर, कधी शिक्षकच दारूच्या नशेत टुल्ल होऊन शाळेत येऊन बसलेत. एकीकडे आपल्याच राज्यात रणजितसिंह डिसले यांच्यासारखे शिक्षक आहेत ज्यांना जगभरात गौरविले जाते. तर, दुसरीकडे सरकारी शाळांमधील असेही काही शिक्षक आहेत जे फक्त हजेरी लावण्यासाठी शाळांमध्ये येतात. याचमुळे पालकांचा सरकारी शाळा आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीवरुन विश्वास उडत चालला असून, ते त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये टाकण्यापेक्षा खाजगी शाळांमध्ये टाकणे चांगले समजतात.(Solapur University)
दरम्यान, याचमुळे सरकारी शाळांना कुलूप लागण्याची वेळ आली आहे. या शाळांची पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत असून, काही ठिकाणी तर अक्षरशः ४ ते ५ विद्यार्थी पटावर आहेत. तर, पुन्हा एकदा अशाच एका घटनेमुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ही घटना सोलापूरमधील सोलापूर विद्यापीठातून समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा निकालांबाबतचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. येथे विद्यार्थ्यांना चक्क ५० पैकी ९९ गुण दिल्याने हे विद्यार्थीही चक्रावले. बी.एस.सी पदवीच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या निकालातील हा प्रकार आहे. (Solapur University)
Lok Sabha 2024 | काय सांगता..! या लोकसभेतही मोदींचीच लाट..?
Solapur University | ५० पैकी ९० गुण
येथे एका नाहीतर, अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात ५० गुणांच्या परीक्षेत ५० पेक्षा जास्त गुण दिले आहेत. सोलापूर विद्यापीठात १३ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२३ या काळात बी.एस.सी तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा झाल्या होत्या. दरम्यान, या परीक्षांचा चक्रवणारा निकाल पाहून सगळेच थक्क झाले. कारण या निकालात सोलापूर विद्यापीठाकडून एकूण ४० गुणांचा लेखी पेपर आणि १० गुणांचे उपक्रम असे एकूण ५० गुणांची ही परीक्षा घेण्यात आली होती.(Solapur University)
Nashik | असा आहे देवेंद्र फडणवीस यांचा ‘नशिक दौरा’
विद्यापीठाचे स्पष्टीकरण
तर, बी.एस.सी च्या परीक्षांचा निकाल हा ५ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजेच सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण या निकालात झालेल्या चुकांमुळे संबंधित विद्यार्थी काही काळ गोंधळले. मात्र, त्यानंतर काही क्लेरीकल चुकीमुळे हे घडले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं. दरम्यान, ही चूक लक्षात येताच या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने गुणपत्रिका बदलून दिल्याचीही माहिती सोलापूर विद्यापीठाअरफे देण्यात आली आहे. तसेच, काही क्लेरीकल चुकांमुळे या पदवीच्या चार विद्यार्थ्यांच्या निकालाच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाने दिले आहे.(Solapur University)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम