Shortage Of Condoms | सध्याच्या काळात भारत हा लोकसंख्येच्या आलेखत सर्वात वरच्या स्थानावर आहे. दरम्यान, भरात हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून, अशातच आता काही रिपोर्ट्समधून एक धक्कादायक दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, आगामी काळात भारतात कांडोमची कमतरता भासू शकते असा, दावा या रिपोर्ट्मधून करण्यात येत आहे. त्यामुळे जर, कांडोमची कमी ही भारतात जानवली तर, याचा देशाच्या कुटुंब नियोजनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असंही यावर सांगितलं जात आहे. केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी, हे योग्य वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा करण्यात अयशस्वी ठरल्याचा दावा देखील ह्या रिपोर्ट्समधून करण्यात आलेला आहे. पण, देशाच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावलं आहे.
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे वृत्त फेटाळतांना म्हटले की, “हे वृत्त चुकीचं असून, देशात कंडोमचा तुटवडा भासणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्सद्वारे करण्यात येत आहेत. केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी हे वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे देशाच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर याचे वाईट परिणाम होणार असल्याचंदेखील या रिपोर्ट्समधून म्हटलं आहे.
Crime news | ८ मुलीच झाल्या म्हणून पतीचा छळ; पत्नीने शेजाऱ्यालाच दिली सुपारी
यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, भारत सरकारकडे गर्भनिरोधक औषधांचा जो साठा सध्या आहे. तेवढा साठा हा राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. सोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की, मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी CMSS हे विविध औषधं तसेच वैद्यकीय वस्तू खरेदी करत असतं आणि त्यांची निविदा प्रक्रिया तसेच, पुरवठ्याच्या स्थितीवर पूर्ण लक्षही ठेवलं जातं.
५.८८ कोटी इतका कंडोम साठा
राजधानी दिल्लीमध्ये CMSS ही एक स्वायत्त संस्था आहे. जी देशाच्या केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असते. केंद्रीय खरेगी एजन्सी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण ह्या कार्यक्रमासाठी ही संस्था कंडोम खरेदी करतअ सते.
CMSS ने ‘मे’ २०२३ मध्ये सरकारच्या कुटुंब नियोजन ह्या कार्यक्रमासाठी ५.८८ कोटी इतके कंडोम खरेदी केलेले आहेत. त्यामुळे सध्या भारत सरकारकडे उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या ही ह्या कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुबलक आहे.तसेच, CMSS ला कंडोम खरेदीसाठी विलंब झाल्यामुळे देशात कंडोमचा तुटवडा जाणवणार नाही.
Nashik | ‘फाळके स्मारक’ विकसित करण्यासाठी मंत्री भुसेंचे साकडे
CMSS ने ह्या चालू वर्षातही कंडोम खरेदीसाठी आधीच निविदा केलेल्या आहेत आणि ह्या निविदांचं कामदेखील अंतिम टप्प्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय हे सध्याच्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असल्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नसल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे, असंही यावेळी मंत्रालयाने म्हटलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम