शिवसेना वैद्यकीय कक्षा तर्फे मोफत 2D इको तपासणी शिबिर; लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

0
20
Shivsena
Shivsena

Shivsena |  शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात प्रथमच लहान मुलांची (वयोगट १९) मोफत 2D इको तपासणी आणि हृदयाची शस्त्रक्रिया शिबिर या योजनेच्या अंतर्गत गोविंद नगर येथील अपेक्स वेलनेस हॉस्पिटल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

नाशिक जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष नेहमीच वेगवेगळे शिबिर आयोजित करत असतो. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादाजी भुसे, खा. श्रीकांत शिंदे, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य आविष्कार भुसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खा. हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, मंगेश चिवटे, राम हरी राऊत, आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, हितेश पाटील, प्रथमेश पाटील, हर्षल शिंदे, वेदान्त तीदमे, आदी पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

काय आहे 2D इकोकार्डियोग्राफी

2D इको म्हणजे 2D इकोकार्डियोग्राफी. या चाचणीमध्ये ध्वनी कंपनांच्या मदतीने हृदयाच्या वेगवेगळ्या भागांची प्रतिमा मिळते. नुकसान, अडथळे तसेच रक्त प्रवाहाचा दर तपासण्यास याची मदत होते. हृदयाच्या कुठल्याही समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी तसेच त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर नियमित 2D इको चाचण्यांची शिफारस करतात.  तसेच, या ध्वनी लहरींचे नंतर प्रतिमांमध्ये रूपांतर होते. जे मॉनिटरवर बघता येते. तयार केलेल्या प्रतिमा या डॉक्टरांना हृदयाच्या विविध स्थिती व रोगांचे निदान करण्यासाठी तसेच उपचारांच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करतात.(Shivsena)

का केली जाते 2D इको चाचणी?

१. 2d Echo test खालील हृदयाच्या विविध स्थिती शोधते.

२. अंतर्निहित हृदय रोगांचे विश्लेषण करण्यासाठी

३. रक्ताच्या गुठळ्या किंवा ट्यूमर

४. हृदयाच्या झडपाची खराबी

५. हृदयात रक्त प्रवाहाची असामान्यता तपासण्यासाठी

दरम्यान, या शिबिराचे आयोजन हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर ७ जानेवारी रोजी अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, गोविंद नगर, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी पुढील क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Shivsena)

हर्षल शिंदे
९९६००९००२८

हितेश पाटील
७९७२७३९४३१


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here