बुलढाणा – बुलढाण्यात एका आमदारपुत्राने आपल्या कार्यकर्त्यांसह एकत्र येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, परिणामी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी पोलीसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करत परिस्थिती हाताळली.
बुलढाणा कुषी उत्पन बाजार समितीत शिवसेनेच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमात आले, आणि शिवसेना आमचीच म्हणत एकाच गोंधळ घातला.
यावेळी आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट समोरासमोर भिडले आणि दोन्ही गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले होते. विशेष म्हणजे, कार्यकर्ते चक्क पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातापरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
आधीच शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यापासून बऱ्याचदा शिवसेनेवर आपला दावा ठोकत आहे, त्यातच हा खटला न्यायालयात प्रलंबित असूनही अनेकवेळा शिंदेगटाचे नेते शिवसेनेवर नाना तऱ्हेने ठाकरेंवर कुरघोडी करत आहे. आता कार्यकर्तेही ह्या प्रकरणावरून थेट एकमेकांशी भिडत असल्याने हा संघर्ष विकोपाला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम