दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा पाहायला मिळणार संघर्ष

0
41

Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे गट मैदानात उतरलेले असताना शिवाजी पार्क मैदान हे आमच्याच गटाला मिळावं, यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो.दसरा मेळाव्याच्या सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरेंची शिवसेना (उबाठा) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.तसेच, आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून एक पत्र मुंबई महापालिकेला पाठवलं जाणार आहे. जर दोन दिवसांत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय नाही दिला, तर मात्र वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार ठाकरे गट पुढील भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी (Shivsena Dussehra Melava) शिवसेनेच्या दोन्ही गटांनी परवानगी अर्ज दाखल केल्यानं प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

Jitendra Joshi : जितेंद्र जोशीचा ‘रावसाहेब’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे गट मैदानात उतरलेले असताना शिवाजी पार्क मैदान हे आमच्याच गटाला मिळावं, यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क आपल्याला दसरा मेळाव्यासाठी मिळावा, यासाठी महिन्याभरापूर्वीच एक पत्र बीएमसी विभागीय कार्यालयाला पाठवलं आहे. आता याच पत्रावर निर्णय घेण्याआधी मुंबई महापालिका विधी विभागाचं मार्गदर्शन घेते आहे.

Mumbai | मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत निर्णय

दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसेनेची खास ओळख आहे. बाळासाहेब ठाकरेंची विशेष आठवण आणि शिवसैनिकांचा उत्साह म्हणजे दर विजयादशमीला साजरा होणार दसरा मेळावा. 2021 पर्यंत दसरा मेळावा म्हणजे, शिवसेनेचाच (उबाठा) आणि शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा तर ठाकरेंचा हीच ओळख होती. पण शिवसेना फुटली आणि दसरा मेळाव्याला वादाचं ग्रहण लागलेलं आहे. यंदाही तेच ग्रहण कायम आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदेंचा की, ठाकरेंचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here