मुंबई : शिवसेना व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास संध्याकाळ पासून सुरुवात झाली असून अनेक नेत्यांची भाषणे सध्या सुरु आहेत. मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्याची वेळ ५ वाजेची असताना त्यास बराच वेळ लागत असल्याने एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यादरम्यान भाषण करणार का, अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीकेसी मैदानाच्या दिशेने निघाले असून, तर ठाकरे हे नुकतेच शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, शिंदेंच्या दसरा मेळाव्याची नियोजित वेळ ५ वाजेची असताना काही जणांकडून अगोदर शिंदेच्या भाषण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ७ वाजले आहे, तरी अद्यापही शिंदेंच्या भाषणाला सुरुवात झाली नाही.
तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणाला ८ वाजता सुरुवात होणार होती. मात्र, शिंदेनी केलेल्या हायजॅकमुळे आता या सभेला उशीर होणार असल्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी दोन्ही गटाच्या अनेक नेत्यांनी दोन्ही मैदानात आपापली भाषणे केली आहेत.
हे करतील शिंदे गटाच्या मेळाव्यात भाषण
- एकनाथ शिंदे
- गुलाबराव पाटील
- रामदास कदम
- शहाजीबापू पाटील
- अब्दुल सत्तार
- तानाजी सावंत
- दीपक केसरकर
- भावना गवळी
- संदिपान भुमरे
- राहुल शेवाळे
- श्रीकांत शिंदे
हे असतील शिवतीर्थावर भाषण करणारे नेते
- उद्धव ठाकरे
- भास्कर जाधव
- नितीन बानुगडे पाटील
- सुषमा अंधारे
- अंबादास दानवे
- किशोरी पेडणेकर
- सुभाष देसाई
- अरविंद सावंत
- चंद्रकांत खैरे
- विनायक राऊत
- आदित्य ठाकरे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम