मुंबई – दसरा मेळावा कोणाचा, यावरून शिंदे-ठाकरे गटात मोठा संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटांनी महापालिकेत अर्ज केले असताना शिंदे गटाकडून मात्र जुन्या नेत्यांना आमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर ठाकरे गटाकडूनही शिवाजी पार्कातील दसरा मेळावा आमचाच म्हणत शिंदे गटावर टीकेची झोड उडवली आहे. आता यात किशोरी पेडणकरांनी दोन ट्वीट करत शिंदे गटाला टोला लगावला आहे.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केले आहे.
पेडणकरांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचा ‘दसरा मेळावा…आतूरता’ या कॅप्शनचा फोटो ट्वीट केला आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ‘दसरा मेळावा शिवतीर्थावरच, मी उद्धवजीं सोबत….’ असे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ह्या ट्वीटमुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022
#दसरा_मेळावा शिवतीर्थावरच….
मी उद्धवजीं सोबत…. pic.twitter.com/sG6BwJigT9— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022
शिंदे गटाने बंड केल्यापासून किशोरीताई आक्रमक बनल्या आहेत. त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहत शिंदेगटावर अनेकदा निशाणा साधला आहे, अगदी दसरा मेळाव्यावरूनही. त्यांनी शिंदे गटाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या ५६ वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका, असे आवाहनही केले होते. तसेच शिवसेना नेमकी कुणाची याबाबतचा निर्णय न्यायालयात होईल, असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम