शिवसेनेला ‘मोदी’ बळकटी देणार; कोल्हापुरातील बंडा नंतर घेतला मोठा निर्णय

0
28

कोल्हापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर शिवसेनेला गळती सुरू झाली असून शिंदे गटाच्या बंडानंतर सेनेत मोठी फुट पडली आहे. अजूनही अनेक पदाधिकारी शिंदे गटाकडे वाटचाल करत आहेत. कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश क्षीरसागर हे देखील या बंडात सहभागी झाले. त्यामुळे कोल्हापुरातील त्यांचे कार्यकर्तेही बेचैन झाले तर काही समर्थक हे सेनेसोबत आहेत तर काही त्यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. क्षीरसागर आणि आबिटकर समर्थकांना पदावरुन हटवण्यात आले असून शिवसेनेच्या वतीने नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पक्षाची पुनर्बांधणी करणार असल्याचे सेनेचे सुनील मोदी यांनी सांगितलं.

बंडा नंतर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी आणि खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेना कार्यकारिणी बरखास्त होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सर्व कार्यकारिणी आणि पदाधिकारी बरखास्त केली आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात सेनेत फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर स्थानिक पातळीवर दिसत आहेत. एकनाथ शिंदेच्या गटात गेलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या बंडखोरी नंतर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत बदल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच शहरप्रमुख यांच्यासह अनेक पदावरून क्षीरसागर समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आता जुनी कार्यकारिणीही बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नवीन पक्ष बांधणीस सुरुवात केली आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पक्षाची पुनर्बांधणी करणार असल्याचंही यावेळी सुनील मोदी यांनी सांगितलं. तसेच, शिवसेनेला नवी बळकटी देणार, असंही ते म्हणाले. या बैठकीला खासदार संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख तसे पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा डौलाने फडकला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागरही सहभागी झाले. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या बंडामुळे सेनेला मोठा धक्का बसला. मात्र सर्वसामान्य शिवसैनिक मातोश्री सोबत निष्ठा असल्याचे सांगत ठाकरे सोबत उभे आहेत, क्षीरसागर यांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरात शिवसेनेला चांगलाच धक्का बसला. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र ही पक्षबांधणी किती मजबूत होते हे येणाऱ्या काळात समजेलच.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here