द पॉईंट नाऊ ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. यात त्यांनी संबोधित करतांना मी जिद्द सोडली नसल्याचे म्हटले.
जे घडतंय त्याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण मी जिद्द सोडली नाही. कोरोना, माझ्यावर दोन वेळा झालेली शस्त्रक्रिया यामुळे कोणाला भेटता आले नाही. पण यातून सावरत असतांनाच दगा झाला. कोण कोणत्या वेळी कसं वागेल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तर एकीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील भावनिक साद घातली. आपलेच लोक सोडून गेले. आपल्याच लोकांनी दगा दिला. पण आपल्याला एकत्र लढा द्यायचा आहे. असे आदित्य ठाकरे जिल्हा प्रमुखांच्या बैठकीवेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे. शिवसेनेचे जवळपास 38 आमदार हे शिंदे यांच्यासोबत निघून गेलेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.
परंतु, आपण अजून हार मानलेली नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तर मित्रपक्षांनी धोका दिला असता तर त्याचे इतके काही वाटले नसते. मात्र आपल्याच लोकांनी दगा केला, याचे उद्धव ठाकरेंना अधिक दुःख असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आता अजून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होते? कोण कुठले पाऊल उचलते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम