देवळा सायकलिस्टच्या वतीने कांचन बारीत शिवप्रताप दिन साजरा

0
23

देवळा : देवळा सायकलिस्टच्या वतीने शिवस्मारक देवळा ते कांचनबारी सायकल राईड करत तालुक्यातील ऐतिहासिक कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी शिवप्रताप दिनानिमित्त स्वप्नील ऍग्रोचे संचालक व देवळा सायकलिस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी कांचने येथील विद्यार्थी अमोल पिंपळे याला सायकल भेट देऊन शिवप्रताप दिन साजरा केला.

देवळा सायकलिस्टच्या वतीने कांचन बारीत अरुण पवार यांनी अमोल पिंगळे याला सायकल भेट देत शिवप्रताप दिन साजरा केला याप्रसंगी उपस्थित सायकलिस्टचे सदस्य छाया सोमनाथ जगताप

यावेळी देवळा ते कोटमगाव वारीतील सदस्यांना प्रमाण पत्र देण्यात आले. शिवप्रताप दिनी छत्रपती शिवरायांनी त्यांच्या गनिमी काव्याने न लढता समोरासमोरच्या लढाईत दाऊतखानाचा संपुर्ण पराभव कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी केला. आपल्या सैन्याची त्रिशुल रचना करत एक तुकडी हंड्याच्या डोंगरावरील तोफखाना नष्ट करण्यासाठी एक तुकडी भावडबारीतुन पिछाडीवरुन कांचन किल्यावर, व स्वतः महाराज कनकापूर येथुन कांचन किल्ल्यावर. एकाच वेळी हल्लाबोल करत दाऊतखानाचा फडश्या पाडत सुरत लुटीतील खजिना सुरक्षित ठेवत स्वराज्यात सुखरुप पोहचले. दाऊतखान हा काही साधासुधा सरदार नव्हता.

औरंगजेबाचा विश्वासू दक्षिण सुभ्याचा सुभेदार व अंत्यत पाताळयंत्री समशेर बहादूर होता पण थोरल्या महाराजांनी त्याचा पुरता नक्षा उतरवला.आपले परम भाग्य की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनातील प्रमुख तीन प्रसिध्द लढाई ज्या अमेरिकन सैनिकांंना त्याच्या प्रशिक्षणात अभ्यासाव्या लागतात. यात कांचन मांचनची लढाईची युध्दभुमी आपल्या देवळा तालूक्यात आहे. म्हणून देवळा सायकलिस्टच्या वतीने कांचन बारीत शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला , यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याकामी पंकज जाधव यांनी विषेश परिश्रम घेतले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here