आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत. मनसे नेते संदीप देशपांडेची शिवसेनेवर सडकून टीका.
राज ठाकरेंचे सभेवर निशाणा साधून माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपाची चाल असल्याचा आरोप केला. तसेच हिंदुत्वावरुन राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना शिवसेनेची आक्रमकता म्हणजे केवळ बुडबुडे आहेत, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे ट्विटमध्ये ‘ अर्धे भाजपवर तुटून पद अर्धे मनसेवर तुटून पडा, मी घरीच बसतो’ असं म्हणत देशपांडे टोला लगावला आहे. जशी गुढीपाडव्याची सभा झाली आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. मला असं वाटतं त्याचा पुढचा टप्पा हा संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरमधून एक ऐतिहासिक मॅसेज नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभर जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम