Skip to content

‘शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण आणि बेदम मारहाण’


द पॉईंट नाऊ ब्युरो : सुरतमध्ये शिवसेनेच्या 25 हुन अधिक आमदारांसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. मात्र आता सुरतमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांना बळजबरीने हॉटेल मध्ये कोंडण्यात आले आहे. आमदारांनी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पोलिसांद्वारे मारहाण करण्यात आली आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आणि भाजपने आपले 5 उमेदवार निवडून आणले. पुन्हा एकदा महाविकास आघाडी मधील आमदार फुटल्याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूकीपासून नॉट रीचेबल झाले आणि शिवसेनेचे धाबे चांगलेच दणाणले. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार पडणार याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र वारंवार आपले सर्व आमदार परत येतील हा विश्वास व्यक्त केला. आणि आता शिवसेनेच्या आमदारांना सुरत मध्ये मारहाण झाली असल्याची माहिती मिळाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आता यामागे नेमके काय आणि कसे तथ्य आहे? हे सुरतमध्ये असलेले शिवसेना आमदारच जाणोत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!