दिल्ली : आताची सर्वात मोठी बातमी येत आहे दिल्लीहून. शिंदे गटाच्या चिन्हाचा सस्पेन्स अखेर संपणार आहे. थोड्याच वेळात शिंदे गटाला म्हणजेच “बाळासाहेबांची शिवसेनेला” नवीन निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे.
शिंदे गटाने काल आयोगाकडे सदर केलेल्या चिन्हांपैकी सर्व चिन्हे बाद ठरवली होती. त्यामुळे शिंदे गटाला आज सकाळपर्यंत नवे चिन्ह सुचवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने ‘तळपता सूर्य’, ‘ढाल तलवार’ आणि ‘पिंपळाचे झाड’ या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्यापैकी आयोगाने गटाला ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह देण्यात येणार असल्याची सर्वाधिक शक्यता आहे. जर ह्याला मंजुरी मिळाली, तर राज्यात शिवसेनेच्या दोन गटात मशाल आणि तळपता सूर्य यांच्यात मोठी लढत होईल.
निवडणूक आयोगाने सोमवारी शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले होते. मात्र, शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय बाद ठरवल्यामुळे त्यांना पुन्हा नवीन चिन्हे सादर करण्याचे आदेश दिले होते. याचे कारण म्हणजे, शिंदे गटाने जे चिन्ह सुचावली होती, त्यातील ‘त्रिशूळ’ व ‘गदा’ हे धार्मिक चिन्ह असल्यामुळे, तर ‘उगवता सूर्य’ हे एका राजकीय पक्षाचे असल्यामुळे ही सर्व चिन्ह नाकारले होती.
तर दुसरीकडे ठाकरे गटाला कालच ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याने लाखो शिवसैनिकांनी ह्याचे स्वागत करत या चिन्हाचा फोटो सोशल मीडियावर आपल्या प्रोफाईल डीपीला लावला. तसेच अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून कार्यक्रमांचे आयोजन करत याचा आनंद साजरा केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम